आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये धक्कादायक प्रकार:रुग्णांच्या नातेवाइकांकडून हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टर सोडून पळाल्याने नातेवाईक संतप्त

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको परिसरातील हॉस्पिटलची रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शहरातील एमजीएम रुग्णालयाच्या समोर असलेल्या इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. तोपर्यंत रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.

इंटरनॅशनल हॉस्पिटलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.
इंटरनॅशनल हॉस्पिटलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.

सिडको परिसरातील महात्मा गांधी मिशनच्या रुग्णालयाच्या समोर असलेल्या इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये एका वीस वर्षे तरुणीला दाखल करण्यात आले होते. या तरुणीच्या पोटात दुखत असल्याने तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शास्त्रक्रिया केल्यानंतरही सदरील तरुणी शुद्धीवर आली नसल्याने हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी तिला सिटीस्कॅन करण्यासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवले. यासाठी रुग्णसोबत इंटरनॅशनल हॉस्पिटलचे दोन डॉक्टर देखील होते. मात्र दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्यानंतर सदरील दोन्ही डॉक्टरांनी पळ काढला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने हानी टळली.
पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने हानी टळली.

डॉक्टर समोर न आल्याने गोंधळ वाढला

तरुणीला दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर रुग्णासोबत आलेले दोन्ही डॉक्टरांनी पळ काढला. मात्र त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी पुन्हा इंटरनॅशनल रुग्णालय गाठून शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांशी बोलण्याची मागणी केली. मात्र, एकही डॉक्टर समोर न आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला त्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळतेय. या संदर्भात रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...