आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपल्या शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचे साधेपणा दर्शविणारी काही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ते साध्या कपड्यात खांद्यावर पिशवी घेऊन भाजी मंडईतून बाहेर पडताना दिसत आहे.
एका शेतकरी कुटुंबातून असलेल्या सुनिल केंद्रकरांचे हे फोटो औरंगाबादच्या खुलताबाद मंडईतील आहेत. शनिवारी सकाळी ते पत्नीसोबत आपल्या खासगी गाडीतून येथे आले होते. या दरम्यान कुणीतरी त्यांचे फोटो घेतले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले.
सोशल मीडियामध्ये अशी चर्चा रंगली आहे की वर्ग एक अधिकारी नेहमी एसी कार्यालयात किंवा लक्झरी कारमध्ये फिरताना दिसतात. त्यांना कोणतेही सामना आणण्यासाठी वेगळा नोकर मिळतो. मात्र, असे असूनही केंद्रकरांसारखे अधिकारी क्वचितच दिसतात.
सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे
लोक केंद्राकर यांच्या साधेपणाचे कौतुक करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की, ''हे फोटो बघा. खादी आणि खाकी यांच्या खूप पुढे जाणारं हे चारित्र्य आहे. समाजाचे खरे हिरो! हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर- आयएएस. आणि मिसेस केंद्रेकर. औरंगाबादेत भाजी बाजारात खरेदी करतांना. आपल्या कर्तृत्वानं 'खास' बनल्यानंतरही 'आम' राहण्यात खरी कसोटी लागते माणसांची. कोणतंही ढोंग न करता साधेपणा कसा टिकवला जाऊ शकतो याचं हे फोटो उदाहरण आहेत. माझ्या पाहण्यात हे फोटो आले तेव्हा राहवलं नाही. फोनवरून त्यांची परवानगी घेतली. पुढच्या पिढीत हा साधेपणाचा आणि सच्चेपणाचा आदर्श झिरपावा म्हणून हा उद्योग. त्यांनी परवानगी दिली, हे सांगत की यात विशेष काही नाही, हे माझं रूटीन आहे. श्रीमती केंद्रेकर यांचा साधेपणाही लक्षणीय. महाराष्ट्र नशीबवान आहे. प्रशासनात आजही असे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं माणूसपण सुटलेलं नाही. जे तरूण मित्र एमपीएससी, आयएएस होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी हे फोटो कायम स्मरणात ठेवावेत म्हणून पोस्ट करत आहे.''
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.