आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध गर्भपाताने औरंगाबाद हादरले:महिलेची गर्भपिशवी फाटल्याने रॅकेट उघडकीस, 3 वर्षांपासून सुरू होता प्रकार, डॉक्टर दाम्पत्य फरार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गाजलेल्या मुंडे गर्भपात केंद्राची पुनरावृत्ती औरंगाबाद जिल्ह्यात झाल्याचे पाहायला मिळाले. चित्तेगाव येथील स्त्री रुग्णालयात महिलांचे अवैधरित्या गर्भपात सुरु असल्याचे रॅकेट यानिमित्ताने उघड झाले आहे. एका महिलेची प्रकृती बिघडल्याने शनिवारी रात्री उशिरा ही घटना समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. अमोल जाधव व डॉ. सोनाली जाधव हे गेल्या तीन-चार वर्षापासून चितेगाव येथील पांगरा रोडवर स्त्री रुग्णालयाच्या नावाने हॉस्पिटल चालवत होते. दरम्यान याच रुग्णालयात ते गर्भपात देखील करायचे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. मात्र याची कानोकान खबर कोणाला लागली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अशी उघडकीस आली घटना

अमोल जाधव आणि त्याच्या पत्नीने एका महिलेचा 2 जानेवारीला गर्भपात केला होता. मात्र यावेळी शस्त्रक्रिया करताना महिलेची प्रकृती बिघडली आणि तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे डॉ. अमोल जाधव याने महिलेलेला औरंगाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेले. पण प्रकृती गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयाने देखील उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेलेला एका शासकीय रुग्णालयात दाखल करून डॉक्टर अमोल जाधव फरार झाला. रुग्णालयाने सर्व प्रकार पोलिसाना कळवला.

रुग्णालयावर टाकला छापा

ही महिला बुलडाणा जिल्ह्यातील असून घाटी रुग्णालयात तिला भरती करण्यात आले. त्यावेळी तिचा गर्भ बाहेर आल्याचे आणि गर्भपिशवी फाटल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करत महिलेचा जीव वाचवला. आरोग्य विभागाने रात्री उशिरा चितेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयावर छापा टाकला. त्यावेळी याठिकाणी निर्बंध असलेली औषधी आणि गर्भपातासाठीचे साहित्य आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...