आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत गांजाची विक्री:आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी; जामीन अर्जावर 22 ऑगस्टला होणार सुनावणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांजाची विक्री करण्‍यासाठी 500 रुपये रोज प्रमाणे वृध्‍दाला कामाला ठेवून पडद्याच्‍या मागून गांजाचा विक्री धंदा चालवणारा मुख्‍य आरोपी जावेद खान आयुब खान (42, रा. नुतन कॉलनी) याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश डी.एच. केळुसकर यांनी दिले.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एनडीपीएसच्‍या विशेष पथकाने मिळालेल्या माहिती आधारे 3 ऑगस्‍ट रोजी नुतन कॉलनी येथे छापा टाकून गांजाची विक्री करणार्या सय्यद आरेफ नेहरी सय्यद माहेम्मद अली नेहरी (71, रा. महोम्मद अरब सहाब दर्गा रोड, दौलताबाद) याला अटक करुन 36 हजार 510 रुपयांची रोख रक्कम आणि पिशवी मध्‍ये दोन किलो 72 ग्रॅम गांजा हस्‍तगत केला होता. त्‍याची चोकशी केली असता त्‍याने गांजा जावेद खान याचा असून त्‍याने 500 रुपये रोजाप्रमाणे सय्यद आरेफ नेहरी याला गांजा विक्री करण्‍यासाठी ठेवल्याची कबुली दिली. त्‍यानूसार पोलिसांनी पसार झालेला मुख्‍य आरोपी जावेद खान याच्‍या मुसक्या आवळल्या.

आतापर्यंत 15 गुन्हे दाखल

जावेद खान विरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात 11, जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात दोन तर जवाहरनगर आणि उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍यात प्रत्‍येकी एक असे एकूण 15 गुन्‍हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीला आजपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्‍यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्‍याची न्‍यायालीयन कोठडीत रवानगी करण्‍यात आली. आरोपीन जावेदन याने नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला असून त्‍या अर्जावर 22 ऑगस्‍ट रोजी सुनावणी होणार आहे.

22 ऑगस्टला सुनावणी

शहरात वाढलेले गांजाच्या तस्करीचे प्रकार यामुळे अधिक सावधानता बाळगावी लागणार असल्याचे सहाय्यक सरकारी वकील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले अशाप्रकारे आरोपीला जामीन दिल्यास तो सुटल्यानंतर पुन्हा गांजाच्या तस्करीचा व्यवसाय जोमाने करू लागतो त्यामुळे संबंधितास तूर्तास जामीन देण्यास येऊ नये अशी ही विनंती करण्यात आली होती त्यामुळे न्यायालयाने त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली आता संबंधिताच्या जामीन अर्जावर 22 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे

बातम्या आणखी आहेत...