आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:'चला मुलांनो शाळेत चला' अभियान राबवा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून आनंददायी वातावरण निर्माण करा; मुख्याध्यापकांच्या बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळापूर्व तयारी जोरात शुक्रवार, शनिवार शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घ्या
  • कोविड-19 चे सर्व नियम पाळत विद्यार्थी सुरक्षेबरोबरच बोर होणार नाहीत याचीही काळजी घ्या
  • मुख्याध्यापकांच्या बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना

गेल्या दीड ते पावणे दोन वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. येत्या ४ ऑक्टोंबर पासून शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मनपा शिक्षण विभागाच्या वतीने "चला मुलांनो शाळेत चला' (बॅक टु स्कुल) अभियान राबविण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देत विद्यार्थी शाळेत आल्यावर तणाव मुक्त राहतील बोर होणार नाही. याची काळजी घ्या. तसेच शाळा सुरु होण्याची पूर्वी तयारी करत शुक्रवार आणि शनिवार दोन दिवसात शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांची बैठक घ्या. त्यांचे समुपदेशनही करा अशा सूचना महानगर पालिकेचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सर्व मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना गुरुवारी दिल्या.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी सुरक्षेसाठी परीक्षा न घेताच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. यासाठी ऑनलाइन वर्ग सुरु करण्यात आले. परंतु ऑनलाइनमध्ये येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा मानसिक ताण-तणाव, बालविवाह, बालमजुरी, शाळाबाह्य होण्याची भिती आदी समस्या विचारात घेता आणि कोविडची परिस्थिती पाहता. १५ जुलै पासून ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. यानंतर शहरातील शाळा सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरत होती. टास्क फोर्सने शाळा सुरु करण्याबाबत अनुकूलता दर्शविल्यावर आता ४ ऑक्टोंबर पासून शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळांनी पूर्व तयारी सुरु केली असून, गुरुवारी बॅक टु स्कुल करिता मुख्याध्यापकांची बैठक शहरातील विविध केंद्रावर बोलविण्यात आली होती. यावेळी थोरे यांनी मुख्याध्यापकांना विद्यार्थी सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळांनी योग्यरित्या पार पाडावी, शाळेचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थी नियोजन, करण्याबरोबरच शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करुन घेण्याच्या सूचना केल्या. तसेच विद्यार्थी इतक्या दिवसानंतर शाळेत येत असल्याने त्यांचा तणाव दूर होईल. शाळेची गोडी निर्माण होईल ते बोर होणार नाहीत याची काळजी घ्या अशा सूचना करण्यात आल्या आहेत. शहरात जवळपास ४१३ आठवी ते बारावीच्या शाळा आहेत. त्यापैकी ३४५ शाळांचे मुख्याध्यापक बैठकीस हजर होते. ७८ हजार ८८८ विद्यार्थी असून, ३ हजार ५४४ शिक्षक आणि साडेबारा हजार शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. या बैठकीस सर्व माध्यमांच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य होते. विषय साधण व्यक्ती रेणुका कागदे, विशेष शिक्षक गणेश लक्कस, समन्वयक फहीम अन्सारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डी.बी. सांगळे यांची उपस्थिती होती.

दैनंदिन कामकाजाची माहिती कळवणे आवश्यक -
दरम्यान शाळा सुरु झाल्यावर रोजची विद्यार्थी पटसंख्या, शिक्षकांचे लसीकरण, राबविलेले उपक्रम, जर कुणी आजारी आढून आल्यावर त्यास विद्यार्थी असो वा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नजीकच्या रुग्णालयात तपासणी करुन घेणे, कुणी कोरोना बाधित आढळून आले तर कोविड नियमांचे सर्व नियम पाळणे याची संपूर्ण माहिती शिक्षण विभागास कळवणे शाळांना अनिवार्य राहिल. त्यासाठी एक लिंकही देण्यात येईल. तसेच सोमवार पासून शाळा सुरु होत असल्याने पालकांचे संमतीपत्र याबरोबरच शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेवून समुपदेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- रामनाथ थोरे शिक्षणाधिकारी मनपा

बातम्या आणखी आहेत...