आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाई होणार:इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल होणारच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली माहिती; जलील यांना खांद्यावर बसवून कार्यकर्त्यांनी केला होता जल्लोष

औरंगाबाद (प्रविण ब्रह्मपुरकर)17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जलील यांच्यावतीने लॉकडाऊन रद्द केल्यानंतर त्यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्ते जल्लोष करत होते.

खासदार इम्तियाज जलील यांना खांद्यावर बसवून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. याबाबत कोणीही कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जलील यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे.

जलील यांच्यावतीने लॉकडाऊन रद्द केल्यानंतर त्यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्ते जल्लोष करत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी 'कौन आया कौन आया, शेर आया शेर आया' अशा घोषणाही दिल्या. या बाबत चव्हाण म्हणाले सामान्य माणसावर जशी कारवाई होते त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधीने नियम मोडला तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होईल. तसेच लोकांनी नियमांचे पालन करावे अश्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

30 मार्चपासून औरंगाबादेत कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सामान्य नागरिकांमधून व्यक्त हाेणारा तीव्र राेष, आमदार-खासदार, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांकडून हाेणाऱ्या विराेधापुढे झुकत अखेर जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून (31मार्च) औरंगाबादेत लागू हाेणारा कडक लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेतला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला होता. मात्र यानंतर इम्तियाज जलील यांनी नियमांचे उल्लंघन करत कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...