आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पातळी वाढली:जायकवाडी धरण 95 टक्के भरले, 18 दरवाजे अर्ध्या फूटाने उघडले; गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन

औरंगाबाद (प्रवीण ब्रम्हपूरकर)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजेश टोपेंनी नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात सोमवारपासून सुरू झालेल्या व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे नद्या, नाले हे दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान जायकवाडीत 1 लाख 21 हजार क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरण 95 टक्के भरले आहे.

नांदूर मध्यमेशवर मधून 30 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर शिवना टाकळी 16 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. औरंगाबाद शहर आणि जायकवाडी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत सतत वाढ होत आहे.

सुरुवातीला जायकवाडी धरणाचे चार दरवाजे अर्धा फूट उघडले. गेट नंबर 10 - गेट 27 गेट 18 गेट 19 या गेटमधून प्रत्येकी 524 या प्रमाणे 2096 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. टप्याटप्याने हा विसर्ग वाढवण्यात आला आणि 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत.

राजेश टोपेंनी नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन
जायकवाडी धरणातील पाणी पातळी वाढल्यानंतर आता राजेश टोपेंनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. टोपे म्हणाले की, 'जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. धरणाचा जलसाठा 95 टक्के वाढल्या गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, पुर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व नागरिकांनी शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळुन गावकऱ्यांची काळजी घ्यवी. कुठलीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांना सतर्क राहून त्याबाबतच्या उपाययोजना त्वरेने करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.' सोबतच या ठिकाणी 24 तास पोलिस पहारा असल्याची माहिती पैठणचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.

फोटो, व्हिडिओ - रवी खंडाळकर

बातम्या आणखी आहेत...