आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य ज्युदो संघटना व पुनित बालन ग्रुपच्या सहकार्याने आणि कोल्हापूर जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने ४९ व्या राज्यस्तरीय कनिष्ठ गट ज्युदो स्पर्धेचे १० व ११ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत औरंगाबादचा संघ सहभागी होणार आहे. औरंगाबाद जिल्हा ज्युदो संघटनेतर्फे १३ सदस्यीय संघाची सचिव अतुल बामनोदकर यांनी घोषणा केली. संघात कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदक विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रद्धा चोपड हिचा देखील समावेश आहे.
संघटनेच्या एन -३ येथील प्रशिक्षण केंद्रात झालेल्या निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 13 खेळाडूंनी जिल्हा संघात स्थान मिळवले आहे. ‘संघात चांगले युवा खेळाडू असून त्यांच्याकडून किमान ४ ते ५ पदकांची अपेक्षा असल्याचे बामनोदकर यांनी यावेळी म्हटले.’ राज्य स्पर्धेसाठी संघातील खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, राज्य तांत्रिक समितीचे दत्ता आफळे, जिल्हा सचिव अतुल बामनोदकर, उपाध्यक्ष मेजर भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, विश्वास जोशी, प्रसन्न पटवर्धन, अमित साकला, प्रशिक्षक भीमराज रहाणे, झिया अन्सारी, अशोक जंगमे, पंच दत्तू पवार, मनिंदर सिंग बिलवाल, सुधीर काटकर आणि सुजाउद्दिन अन्सारी आदींनी अभिनंदन केले.
औरंगाबादचा संघ पुढीलप्रमाणे :
मुली - ४४ किलो आर्या मुळे, ४८ किलो श्रध्दा चोपडे, ५३ किलो उत्कर्षा करंगुले, ५७ किलो राधा साळुंके, ७० किलो सुमेधा पठारे, ७८ किलो शर्वरी चिंचोलकर, +७८ किलो स्वरदा बामनोदकर. मुले - ५५ किलो ओंकार कदम, ६० किलो समीर शेख, ६६ किलो आदित्य अंभोरे, ७३ किलो मंगेश बगाडे, ८१ किलो संभाजी देवकर, ९० किलो श्रीयश लोमटे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.