आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मजुरांना चिरडले:तब्बल 40 किमी पायी चालून रेल्वे रुळावर झोपले होते मजूर, पहाटे 5 च्या सुमारास मालगाडीने चिरडले; 16 जणांचा मृत्यू

करमाडएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांकडून पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख, जखमींना मोफत उपचार

भाऊराव मुळे/सतीश वैराळकर

लॉकडाऊन काळाल जालनात अडकून पडलेल्या मजूरांवर शुक्रवारी पहाटे काळाने घाला घातला. जालनातील एसआरजे या स्टील कंपनीत कामाला असलेले २१ मजूर मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी रात्री रेल्वेरुळावरून औरंगाबादकडे निघाले होते. काही किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर थकेलेले हे मजूर पहाटे औरंगाबाद-जालना मार्गावरील रेल्वेरुळावर विश्रांती घेत असतानाच औंरगाबादकडे येणाऱ्या रिकाम्या मालगाडीखाली मजूर चिरडले गेले. या अपघातात १६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. 

दरम्यान या प्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी मृतांच्या नातेवाईकांना तातडीने पाच लाखांची मदत जाहीर केली असून मृत मजूरांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचे एक उच्चपदस्थ अधिकारी मंडळ विमानाने औरंगाबाद येथे दुपारपर्यंत दाखल होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

मयताची नावे

1) धनसिंग गोंड रा. अंतवळी जी. सहडोल, राज्य - मध्य प्रदेश.

2) निरवेश सिंग गोंड, अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश

3) बुद्धराज सिंग गोंड, रा. अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश

4) अच्छेलाल सिंग, चिल्हारी, मानपुर जी. उमरिया मध्य प्रदेश

5) रबेंन्द्र सिंग गोंड, रा. अंतवळी, जी. सहडोल, मध्य प्रदेश

6) सुरेश सिंग कौल, जी. सडोळ, मध्य प्रदेश

7) राजबोहरम पारस सिंग, रा. अंतवळी, जी. सहडोल, मध्य प्रदेश

8) धर्मेंद्रसिंग गोंड, रा. अंतवळी, जी. सहडोल, मध्य प्रदेश

9) बिगेंद्र सिंग चैनसिंग, रा. ममाज, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश

10) प्रदीप सिंग गोंड, रा. जमडी, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश

11) संतोष नापित, 

12) ब्रिजेश भेयादीन रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, सहडोल.

13) मुनीमसिंग शिवरतन सिंग, रा. नेवासा, पोस्ट, बकेली तहसली पाळी, जी. उमरिया.

14) श्रीदयाल सिंग रा. अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश

15) नेमशाह सिंग चमदु सिंग, रा. नेवासा, पोस्ट बकेली, जी. उमरिया.

16) दिपक सिंग अशोक सिंग गौड  रा. अंतवळी जी. सहडोल, मध्य प्रदेश

जखमी व्यक्ती :-

1) सज्जनसिंग माखनसिंग धुर्वे रा पोंडी ता जुनावणी जिल्हा मंडल खजेरी

जिवंत प्रत्यक्षदर्शी मजूर:-

1) इंद्रलाल कमलसिंग धुर्वे वय 20 वर्ष रा. पोवडी ता. घोगरी जिल्हा मांडला

2) वेरेंद्रसिंग चेंनसिंग गौर वय 27 वर्ष    रा ममान ता पाली जिल्हा उमरिया

3) शिवमानसिंग हिरालाल गौर वय 27 वर्ष रा शाहारगड ता शाही जिल्हा सहडोल

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, सदरील घटना बदनापुर आणि करमाड स्टेशन दरम्यान घडली आहे. हा विभाग रेल्वेच्या परभणी-मनमाड सेक्शनमध्ये येतो. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही मजुर रेल्वे रुळावर झोपले होते. मालगाडी चालकाने त्यांना पाहिले होते, वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, पण घटना घडली. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच या घटनेबाबत आपण रेल्वे मंत्र्यांच्या संपर्कात आहोत असे ट्विट केले.

करमाड पोलिसांनी सांगितले की, मजुर जालन्याहून भुसावळकडे जात होते. आपल्या राज्यात जाण्यासाठी त्यांना तेथून रेल्वे पकडायची होती. मजुर रेल्वे रुळाच्या मार्गाने जात होते. थकल्यानंतर ते रुळावरच झोपले. शुक्रवारी सकाळी सव्वा पाच वाजता मालगाडीखाली चिरडले गेले. 

बातम्या आणखी आहेत...