आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Kranti Chowk Shivaji Maharaj Statue | Aurangabad Shivaji Chowk Shivaji Maharaj News Statue For Shivaji Maharaj Jayanri | Marathi News | Maharaj's Work Will Not Be Complete Without Chhatrapati Shivaji's Successor Sitting On The Throne Of Delhi: Shiva Lecturer Solunke

छत्रपतींच्या विचाराची तळपती तलवार:दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवरायांचे वारसदार बसल्याशिवाय महाराजांचे कार्य पूर्ण होणार नाही : शिवव्याख्याते सोळुंके

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राशी खेटताना छत्रपती शिवरायांचा इतिहास तपासावा, असे उद्गार शिवव्याख्याते प्रदीपदादा सोळुंके यांनी शिवसेनेतर्फे आयोजित शिवजागर उत्सवात बोलताना काढले. दिल्लीच्या तख्तावर शिवरायांचे वारसदार बसल्याशिवाय शिवाजी महाराजांचे कार्य पूर्ण होणार नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील मावळ्यांनी कंबर कसून कामाला लागण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि शिवजयंतीनिमित्ताने ‘छत्रपतींच्या विचाराची तळपती तलवार’ विषयावर प्रदीप सोळुंके बोलत होते. याप्रसंगी आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, शिवजागरचे संयोजक आ. अंबादास दानवे, आ. उदयसिंह राजपूत, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेना शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, नगरसेवक अंकिता विधाते आदी उपस्थित होते.

शिवराय रयतेच्या राज्यासाठी लढत होते : पुढे प्रदीप सोळुंके म्हणाले, “औरंगजेब आणि सगळी मोगलाई स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी लढत होती, तर शिवराय रयतेच्या राज्यासाठी लढत होते. म्हणून जगभर शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. छत्रपती शिवराय लोककल्याणकारी राजे होते. म्हणून जगातील राज्यकर्ते शिवरायांना आदर्श राजा मानतात. मध्यरात्री अनेक किल्ले जिंकणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मध्यरात्री होणार असेल तर योग्यच आहे. शिवरायांच्या राज्यात स्त्रियांचा आदर होता. बलात्कार करणाऱ्यांना ते आपल्या सैन्यातील सरदार असले तरी शिक्षा करत होते. शत्रू पक्षांच्या स्त्रियासुद्धा महाराजांच्या राज्यात सुरक्षित होत्या.

मोगलांकडे अफाट सैन्य आणि पैसा असला तरी महाराजांकडे त्यांच्या जिवाला जीव देणारे निष्ठावंत मावळे होते. जे स्वराज्यासाठी लढतील ते सर्व मराठे अशी त्यांची व्याख्या होती. त्यांच्या सैन्यात अठरापगड जातींच्या मावळ्यांचा समावेश होता. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कार्य केले तर महाराष्ट्राला दिल्ली जिंकणे अवघड नाही, असेही ते म्हणाले.

व्याख्यानाला मोठ्या संख्येने महिला, तरुण, शिवप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेनेचे दिवंगत नेते सुधीर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम झाल्यानंतर शिव आरती आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...