आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेबर कॉलनी बुलडोझर कारवाईचे PHOTOS:सैरभैर झाले रहिवासी, मन हेलावणारा आक्रोश; उरल्या केवळ उद्ध्वस्त वसाहतीच्या खुणा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 65 वर्षांहून अधिक काळ शेकडो शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना हक्काचा निवारा देणारी लेबर कॉलनी आज जमीनदोस्त होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील 338 घरांवर बुलडोझर फिरवला जात आहे. त्यामुळे येथेच संसार फुलवलेली अनेक कुटुंबे सैरभैर झाली आहेत. अनेकांनी आजच्या कारवाईला विरोध करत प्रशासनाविरोधात आक्रोश केला. किमान पर्यायी घरे देऊन पुनर्वसन करण्याची मागणी हे रहिवासी आता करत आहे. मात्र, आजच्या कारवाईमुळे औरंगाबादच्या इतिहासातील एक ऐतिहासिक वास्तू काळाच्या पडद्याआड गेली आहे.

अनेक कुटुंबांच्या सुख-दु:खाची साक्षीदार असलेली लेबर सर्व घरे पाडण्यात येत आहे.
अनेक कुटुंबांच्या सुख-दु:खाची साक्षीदार असलेली लेबर सर्व घरे पाडण्यात येत आहे.
आजच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
आजच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
प्रशासनाने पहाटेच कारवाईला सुरुवात केली.
प्रशासनाने पहाटेच कारवाईला सुरुवात केली.
काँग्रेसचे नेते चंद्रभान पारखे यांनी घर सोडण्यास नकार दिल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आले.
काँग्रेसचे नेते चंद्रभान पारखे यांनी घर सोडण्यास नकार दिल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आले.
घर पाडल्याचे पाहत असताना रहिवाशांना अश्रू अनावर झाले.
घर पाडल्याचे पाहत असताना रहिवाशांना अश्रू अनावर झाले.
जेसीबीच्या सहाय्याने घरे पाडण्यात आली.
जेसीबीच्या सहाय्याने घरे पाडण्यात आली.
कित्येक वर्षे राहत असलेले घर पडताना पाहून महिलांना हुंदके दाटून आले.
कित्येक वर्षे राहत असलेले घर पडताना पाहून महिलांना हुंदके दाटून आले.
लेबर दुसरीकडे जाताना एकमेकींचा निरोप घेणाऱ्याअनेक वर्षांच्या शेजारणींना अश्रू अनावर झाले .
लेबर दुसरीकडे जाताना एकमेकींचा निरोप घेणाऱ्याअनेक वर्षांच्या शेजारणींना अश्रू अनावर झाले .
कारवाईसाठी प्रशासाने पहाटेपासूनच जय्यत तयारी केली होती.
कारवाईसाठी प्रशासाने पहाटेपासूनच जय्यत तयारी केली होती.
लेबर आता केवळ भग्नावशेष उरले आहेत.
लेबर आता केवळ भग्नावशेष उरले आहेत.
पुढील 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे.
पुढील 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे.
लेबर आता फक्त दगड, माती आणि विटांचा खच पडला आहे.
लेबर आता फक्त दगड, माती आणि विटांचा खच पडला आहे.
कारवाईनंतर टेम्पोमधून दगड, माती, विटांचा खच शहराबाहेर नेला जात आहे.
कारवाईनंतर टेम्पोमधून दगड, माती, विटांचा खच शहराबाहेर नेला जात आहे.
कारवाईदरम्यान विभागीय आयुक्त सनील केंद्रेकर इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करताना.
कारवाईदरम्यान विभागीय आयुक्त सनील केंद्रेकर इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करताना.

इनपुट्स - प्रवीण ब्रह्मपुरकर

बातम्या आणखी आहेत...