आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नड तालुक्यातील जेहूरजवळ असलेल्या ठाकरवाडी येथे शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास विज पडून एकूण 12 जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ठाकरवाडी येथील पाच गाय, तीन वासरु अशी आठ तर अंबादास तान्हा मेंगाळ यांचा एक बैल, तर शिवराम पिल्हा मेंगाळ दोन गायी, एक वासरु अशी बारा जनावरे पेडक्याच्या किल्ला पायथ्याशी गायरान जमीनीमध्ये गट 70 मध्ये चरण्यासाठी नेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेच्या जनावरे चरत असताना अचानक यांच्यावर विज पडल्याने या बारा जनावरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.
पशुधनाची संख्या आता दिवसेंदिवस कमालीची घटल्याने जनावरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. विज पडून लहान मोठ्या बारा जनावरांचा मुत्यू झाल्याने या आदिवासी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पोलिस पाटील बाळू सावंत यांनी तहसीलदार संजय वारकड यांना माहिती देताच जेहूर सजाचे तलाठी संगीता सुर्यवंशी यांनी घटनास्थळी येऊन बारा मृत जनावरे पंचनामा केला.
मदतीची मागणी
या आदिवासी शेतकरी कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह या जनावरांनवर होता. आज रोजी ही कुटुंब उघड्यावर पडली असून शासनाने या कुटुंबाला तात्काळ मदत करावी, अशी मागणी कुषिभुषन भाऊसाहेब थोरात, जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुजराणे, उपसभापती सुनिल निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, दिपक पवार, केशव राठोड, सुभाष काळे, योगेश पवार, दिपक पवार, माजी उपसभापती गिताराम पवार, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष देविदास राठोड, उपसरपंच सोमनाथ जाधव, पोलीस पाटील बाळू सावंत, आदीसह नागरीकांनी केली आहे.
गुराखी महिला बचावली
अचानक जनावरांवर विज कोसळली. अगदी जवळच उभ्या असलेल्या असलेल्या जनाबाई मधे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी कन्नड येथे पाठविण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.