आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:संकल्प योग साधनातर्फे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोजागिरीचा पुर्ण चंद्र त्यात गाण्यांची सुरेल मैफल सोबतीला तरूण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही गरब्याचा आनंद लुटला. संकल्प योग साधनातर्फे यावर्षी कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

अश्र्विन महिन्याच्या पोर्णिमेला कोजागिरी पोर्णिमा असते. इंग्रजी महिन्यात बहुतेकदा आक्टोंबर महिण्यात कोजागिरी पोर्णिमा येते. संकल्प योग साधना यांच्यातर्फे पौर्णिमा साजरे करण्याचे हे पहिलेच वर्ष होते. मात्र गेल्या दीड दशकापासून आपल्या योग साधनेचा ते प्रचार करताहेत. अनेकांना योगाचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले आहे. आज साधना योग साधक हे केवळ औरंगाबादपुरतेच मर्यादित नसून महाराष्ट्रात भारतात तसेच भारताबाहे दुबई, अमेरिका, इंग्लड आणि सिंगापुरातही आहेत.

कोरोनाच्या काळात शारिरिक योग उर्जा आधाराची गरज आहे. अशा परिस्थित योग वर्ग ऑनलाइन घेऊन बाळासाहेब जोशी यांनी आपल्या योग साधकांना शारीरिक आणि मानसिक दृष्या सक्षम बनवले. तसेच योग साधक विद्यार्थ्यांकडून योग शिक्षक बाळासाहेब जोशी यांचा कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आला.

हा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम औरंगाबादेतील उस्मानपुरा परिसरातील यशोमंगल मंगल कार्यालयात पार पडला. येथे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सुहास लंके आणि सौ. मधुरा रोंगे यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी डॉ. विनायक खेडकर, सीए प्रशांत नावंदर, कालिंदी देशमुख, अ‍ॅड. संगीता तांबट, प्रमोद डेरे, यांनी विशेष प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...