आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:दिवसा 70, रात्री 30 टक्के पोलिस कर्मचाऱ्यांचा असणार शहरात बंदोबस्त, नाहक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील चाैकाचाैकात पाेलिसांनी मास्क न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली. - Divya Marathi
शहरातील चाैकाचाैकात पाेलिसांनी मास्क न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली.

औरंगाबादेत शनिवार व रविवारी लावलेल्या लॉकडाऊनमध्ये एकूण पोलिस विभागापैकी सत्तर टक्के अधिकारी, अंमलदार दिवसा रस्त्यावर तैनात असतील तर रात्री तीस टक्के कर्मचारी असतील.

मार्च महिन्यात नव्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महसूल, मनपा व पोलिस प्रशासनाने शनिवार व रविवारी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. त्या धर्तीवर आता पोलिस प्रशासनाची पथके दोन दिवस शहरात बंदोबस्त लावून नाहक फिरणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. जवळपास साडेतीन हजार अधिकारी, अंमलदार विभागात आहेत. यापैकी ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावण्यास सांगून उर्वरित सर्व कर्मचारी चोवीस तासांच्या बंदोबस्तासाठी नियोजित करण्यात आले आहेत.

उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दिवसा सत्तर टक्के पोलीस कर्मचारी रस्त्यावर असतील. सुरू असलेल्या आस्थापनांवर गर्दी होऊ नये यासाठी फिरती पथकेदेखील असतील. शिवाय ८० जणांचा स्ट्रायकिंग फोर्स पोलिस ठाण्यांच्या मदतीला असतील. नागरिकांनी कुठल्याही अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरू नये. शिवाय, नोकरदार, सरकारी कर्मचाऱ्यांसह परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ओळखपत्र अवश्य बाळगावे, अशा सूचना खाटमोडे यांनी केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...