आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुन्हा लॉकडाउन:औरंगाबादमध्ये 10 ते 18 जुलै दरम्यान संचारबंदी, भाजीपाला-किराणा दुकानेही राहणार बंद; जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची माहिती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी उदय चौधरी
  • या कालावधीत शहरातील पाचही एमआयडीसी राहणार बंदलोकप्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय,
  • बैठकीला खासदार इम्तियाज जलील गैरहजर

औरंगाबाद मध्ये 10 ते 18 जुलै संचारबंदी असणार आहे. यामध्ये औरंगाबाद वाळुज मधील 5 ही एमआयडीसी बंद राहणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी प्रशासन उद्योजक व्यापारी यांची बैठक पार पडली. यामध्ये खासदार भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, अंबादास दानवे यांची उपस्थिती होती तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर उदय चौधरी मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे याची उपस्थिती होती. या बैठकीला खासदार इम्तियाज जलील गैरहजर होते. 

आ. अंबादास दानवे यांची प्रतिक्रीया

संचारबंदी प्रमाणे कारवाई होणार 

यावेळी चौधरी यांनी सांगितले की, संचारबंदीच्या काळात जशी कारवाई केली होती तशीच कारवाई केली जाणार आहे. हा जनता कर्फ्यु असेल यामध्ये लोकांना माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे लोकांनी लगेच खरेदीसाठी गर्दी करू नये, असा सल्ला ही यावेळी देण्यात आला. शहरातील पाचही एमआडीसी  बंद राहणार आहेत, तसेच भाजीपाला किराणा दुकाने देखील बंद राहणार आहेत, तसेच मनपा प्रशासक आणि पोलिस आयुक या बाबत निर्देश जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले

खा. भागवत कराड यांची प्रतिक्रीया

0