आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउनचा विरोध:'फक्त उद्योजकांना खुश करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय', इम्तियाज जलील यांचा लॉकडाउनविरोधात आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 30 मार्चपासून औरंगाबादमध्ये लॉकडाउन

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. यात औरंगाबादमध्येही येत्या 30 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाचा विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. औरंगाबादचे AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी लॉकडाऊनबाबतचे आदेश जारी केले. लॉकडाऊन दरम्यान किराणा दुकानांना सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत, तर दूध विक्री आणि भाजीपाल्याची विक्री सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतच परवानगी असेल. महत्वाची बाब म्हणजे लॉकडाऊनमधून उद्योग श्रेत्राला वगळण्यात आले आहे. जिल्ह्यातील लॉकडाउनबाबत बोलताना जलील म्हणाले की, 'औरंगाबादमध्ये घेतलाला लॉकडाउनचा निर्णय फक्त उद्योजकांना खुश करण्यासाठी आहे. या निर्णयाविरोधात आम्ही 31 मार्च रोजी आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शनिवारी शहरात कोरोनाने घेतला 28 जणांचा बळी

जिल्ह्यात शनिवारी 1715 नवे रुग्ण अाढळून अाले अाहेत, तर 28 जणांचा बळी गेला. यात 10 महिला आणि 18 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, 1060 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारी अाढळेल्या 1715 नव्या रुग्णांत मनपा हद्दीतील 1257 तर ग्रामीण भागातील 458 जणांचा समवेश आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 77 हजार 350 झाला आहे. मनपा भागातील 900 तर ग्रामीणमधील 160 जण बरे हाेऊन घरी परतले.

बातम्या आणखी आहेत...