आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता 9 नाही तर 8 वाजल्यापासूनच रोज रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिव्य मराठीशी बोलताना 19 मार्चपासून नवीन नियम लागू होणार असल्याची माहिती दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे, हा नियम आता संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात लागू केला जाणार आहे. रात्रीच्या संचारबंदीचा आणि आठवड्यातील शनिवार-रविवारची पूर्ण संचारबंदी हा नियम 4 एप्रिलपर्यंत राहील.
देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत कोरोनाच्या नवीन रुग्णांचा सरासरी आकडा 1200 पर्यंत पोहोचला. त्यामुळे, ही नवीन उपाययोजना केली जात आहे. यापूर्वी लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीच्या नियमांमध्ये केवळ रात्री 9 ऐवजी 8 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असा बदल करण्यात आला आहे.
फक्त एका तासाचा बदल
जिल्ह्यात पूर्वी सांगितल्याप्रमाणेच अत्यावश्य सेवा, वैद्यकीय सेवा अर्थात रुग्णालये आणि औषधालय सुरूच राहतील. यासोबतच दूध विक्री, पेट्रोल-डीझेल, गॅस एजन्सी आणि वृत्तपत्र इत्यादींनाही आधीप्रमाणेच सूट राहील असेही सांगण्यात आले आहे.
असे आहेत नियम
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.