आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ब्रेक द चेन’:औरंगाबादेत आजपासून सर्व बाजारपेठ बंद! ; अत्यावश्यक सेवा सुरूच

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राेज रात्री 8 वाजेपासून रात्रीची संचारबंदी असेल व शनिवार-रविवार पूर्णत: लाॅकडाऊन असेल

राज्य सरकारच्या ‘ब्रेक द चेन’ अादेशानुसार साेमवारी (५ एप्रिल) रात्री अाठ वाजेपासून अत्यावश्यक सेवा वगळता अाैरंगाबाद जिल्ह्यातील सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. फक्त किराणा दुकाने, भाजीपाला, दूध डेअरी, मेडिकल दुकाने, कारखाने सुरू राहतील. हाॅटेलचालक फक्त पार्सल सुविधा देऊ शकतील. सर्व धार्मिक स्थळेही बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी साेमवारी रात्री पत्रकार परिषदेत दिली. राेज रात्री ८ वाजेपासून रात्रीची संचारबंदी असेल व शनिवार-रविवार पूर्णत: लाॅकडाऊन असेल. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांसाठी हे नियम लागू करण्यात अाले अाहेत.

हे बंद राहणार

  • कपडे, इलेक्ट्रानिक्स, फर्निचर, चप्पल अादी दुकाने बंद.
  • बिअर बार, मनोरंजन कार्यक्रम, सिनेमा हॉल, नाट्यगृह, क्रीडा संकुल, व्यायामशाळा,जलतरण बंद.
  • हाॅटेलमध्ये राहणाऱ्यांसाठी भाेजन व बारची सुविधा मात्र चालू.
  • केशकर्तनालये, सलून, स्पा बंद
  • सर्व शाळा, महाविद्यालये बंद. चालू असलेल्या परीक्षा हाेतील. शिक्षकांची काेराेना चाचणी केली जाईल. { सामाजिक-राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाही.
  • निवडणुकीनंतर कुठल्याही मिरवणुकांना परवानगी नाही.
  • परजिल्ह्यांत प्रवासाची मुभा.
  • बांधकाम व्यवसाय : जे लोक तिथे राहत असतील त्यांना आरटीपीसीआर करावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...