आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवाहितेचा नवऱ्यासह सासऱ्याने बळजबरी गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टरसह तीन जणांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २६ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. विवाहितेचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा असून तो आजीकडे राहतो. लग्नानंतर विवाहितेची ओळख उमेर मित्राद्वारे जफिर शेर यारखान (२९, रा. रोहिला गल्ली) सोबत २०२० मध्ये झाली होती. त्यावेळी जफिरने विवाहितेचा मोबाइल नंबर घेतला. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब विवाहितेच्या नवऱ्याला समजल्यावर त्याने तिच्याशी संबंध तोडले. त्या वेळी विवाहिता किराडपुऱ्यात राहू लागली. पाच महिन्यांपूर्वी जफिरने मी तुझा सांभाळ करतो, असे म्हणत रशिदपुऱ्यात घर भाड्याने घेऊन दिले.
या वेळी जफिर व विवाहिता सोबत राहत होते. जफिरपासून विवाहितेला दिवस गेल्याने तिने लग्नासाठी तगादा लावला. या वेळी तू गर्भपात करून घे मग आपण लग्न करू असे जफिर म्हणाला. गर्भपातास विवाहितेने विरोध केला. ३ फेब्रुवारी रोजी रात्री विवाहितेच्या पोटात दुखत असल्याने जफिरने कारने (एमएच २१ व्ही ४५५५) सिडको एन-११ येथील मातोश्री रुग्णालयात तिला दाखल केले. या वेळी जफिरचे वडील शेर यारखान (५०) दवाखान्यात आले. डॉक्टरने विवाहितेला गोळ्या दिल्यानंतर ते घरी आले. दुसऱ्या दिवशी मी तुझा गर्भपात करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे, तू तेथे गेल्यावर काही बोलू नको असे जफिरने विवाहितेला सांगितले. त्याला विरोध केला असता जफिरने विवाहितेला मारहाण करत मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच, गर्भपातानंतर मी लगेच तुझ्याशी लग्न करीन असे आश्वासन दिले. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास जफिरने विवाहितेला मातोश्री हॉस्पिटल येथे नेले. तेथे जफिरचे वडील शेरयारखान होते.
डॉक्टरने गोळ्या देऊन अॅडमिट केले. त्यानंतर दोन तासांनी गर्भपात झाला. डॉक्टरने गर्भ शेरयारखान यांना दिला. त्यानंतर जफिरने विवाहितेला हॉस्पिटलमधून घरी आणून सोडले. याप्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून जफिर, त्याचे वडील शेर यारखान आणि मातोश्री हॉस्पिटलचा डॉक्टर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.