आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad | Maharashtra | Except Aurangabad, The State Is Prone To Air Pollution; The Situation Is Even More Serious In Mumbai, With Moderate To Severe Pollution In The State

चिंताजनक:औरंगाबाद वगळता राज्य हवा प्रदूषणाच्या विळख्यात; मुंबईमध्ये परिस्थिती आणखी गंभीर, राज्यात मध्यम ते गंभीर स्वरूपाचे प्रदूषण

महेश जोशी | औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या काळात काहीसे संयमाने फटाके फोडल्यामुळे समाधानकारक राहिलेली हवेची गुणवत्ता आठवडाभरात ढासळली आहे. राज्याला हवेच्या प्रदूषणाने विळखा घातला असून औरंगाबाद वगळता एकाही प्रमुख शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) समाधानकारक राहिलेला नाही. मुंबई आणि उपनगरांनी प्रदूषणाची पातळी ओलांडली असून परिस्थिती गंभीर झाली आहे.

मंगळवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही गंभीर झाली होती. दक्षिण मुंबईतील कुलाबा सर्वात प्रदूषित ठिकाण ठरले. सफर संस्थेच्या माहितीनुसार मंगळवारी दिल्लीचा एक्यूआय ३७४ तर कुलाब्याचा ३७० होता. यामुळे राज्याच्या हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला.

दिव्य मराठीने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) संकेतस्थळावरील “रिअल टाइम डेटा’ चे विश्लेषण केले. सकाळ आणि रात्री प्रदूषणाचे स्वरूप बदलते. यामुळे १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान सकाळी १० आणि रात्री १० वाजताचा एक्यूआय गृहीत धरण्यात आला. यातून राज्य प्रदूषणाच्या उंबरठ्यावर असल्याचे समोर आले.

मध्यम ते गंभीर स्वरूपाचे प्रदूषण

हवेतील सूक्ष्म धूलिकण म्हणजेच पीएम २.५ आणि २.१०, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, अमोनिया, कार्बन मोनोऑक्साइड, ओझोन यांच्या सरासरीतून एक्यूआय काढला जातो. सीपीसीबीच्या निकषानुसार एक्यूआय ०-५० पर्यंत –सामान्य, ५१ ते १००-समाधानकारक, १०१-२००-मध्यम, २०१-३००-वाईट, ३०१-४००-अत्यंत वाईट तर ४०१-५००-गंभीर स्वरूपात मोडतो.

उपलब्ध आकडेवारीनुसार औरंगाबादचा एक्यूआय १०० च्या खाली म्हणजेच समाधानकारक आहे. चंद्रपूर, नाशिक, सोलापूर, पुणे मध्यम श्रेणीत, नवी मुंबई, कल्याण वाईट तर मुंबई गंभीर श्रेणीत आहेत.

भीषण परिस्थिती

मुंबईतील माझगाव येथील एक्यूआय १० नोव्हेंबरपासून सातत्याने २९० च्या वर आहे. १४ तारखेला तो ३२९ तर १६ तारखेला ३२६ वर गेला होता. मालाडचा एक्यूआय २३० च्या वर आहे. १५ रोजी तो २९६ होता. त्या तुलनेत वांद्रे, बोरिवली पूर्व, देवनार, कांदिवली, सायन येेथील एक्यूआय मध्यम ते वाईट श्रेणीत होता.

पर्यावरणमंत्र्यांचे वरळी प्रदूषित
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात एक्यूआय सातत्याने वाढत आहे. १० रोजी १६०, १३ रोजी २२५ तर १५ रोजी २८८ वर पोहोचला होता.

बातम्या आणखी आहेत...