आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडास्तरीय टेनिस स्पर्धा:रिया, अदिब, वृंदिकाने जिंकले सुवर्णपदक, स्पर्धेत 60 खेळाडूंचा सहभाग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंत टेनिस अकादमीतर्फे आयोजित मराठवाडास्तरीय टेनिस स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत रिया कुलकर्णी, अदिब मोहंमद, वृंदिका राजपूत, आशुतोष कवाडकर यांनी आपापल्या गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. यशवंत कला महाविद्यालयातील टेनिस कोर्टवर झालेल्या स्पर्धेत 60 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेचे उद्घाटन गुरुकृपा अर्बनचे अध्यक्ष रामसिंग बहुरे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना जीएसटी कमिशनर जी. श्रीकांत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक रुपेश रॉय, पंकज राधे, प्रवीण गायसमुद्रे आदींची उपस्थिती होती. ‘जिद्द व मेहनत करा, निक्की यश मिळेल. खेळात प्रगती केल्यास, देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी तुमच्या हाती आहे. जगभरात तुम्ही तिरंगा फडकावू शकतात, असे प्रतिपादन जी. श्रीकांत यांनी केले.

शिवराज, सहर्षचा चमकदार खेळ

युवा टेनिसपटू शिवराज जाधव आणि सहर्ष देवीने रविवारी यशवंत टेनिस स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. शिवराजने 14 वर्षांखालील आणि सहर्षने 10 वर्षांखालील गटाच्या एकेरीत सुवर्णपदक पटकावले. शिवराजने फायनलमध्ये क्रिष्णा राणीचा 6-2 ने पराभव केला. त्यापाठाेेपाठ सहर्षने एकेरीच्या फायनलमध्ये नील 4-2 ने जैनवर मात केली. सरस कामगिरीमुळे हे दाेघेही एकेरीमध्ये किताबाचे मानकरी ठरले आहेत.

स्पर्धेचा अंतिम निकाल

10 वर्ष मुले - संघर्ष देवी (प्रथम), निल एन. (द्वितीय). मुली-रिया कुलकर्णी, श्रुष्टी दत्ता पुरे. 12 वर्ष मुले-अदिब मोहंमद, विश्वास सी. मुली-अक्षरी मांडलिक, रिया कुलकर्णी, 14 वर्ष मुले-शिवराज जाधव, कृष्णा राणी. मुली - वृंदिका राजपूत, श्रृष्टी मिरगे. 18 वर्ष मुले - आशुतोष कवाडकर, देवेश वाडिया. मुली - एम. शेख, वृंदिका राजपूत

बातम्या आणखी आहेत...