आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य नियोजन अन् संपर्काच्या बळावर विक्रम काळेंचा विजय:सूर्यकांत विश्वासरावांची दुसऱ्या पसंतीची मते भाजपला मिळालीच नाहीत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद मराठवाडा शिक्षक मतदारसंघात मतदानाच्या दिवशी विक्रम काळे लातूर उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यातल्या तालुक्यांना भेटीत त्यांनी 290 किलोमीटरचा प्रवास केला होता. सततचा प्रवास आणि शिक्षकांची वैयक्तिक संपर्क यामुळे काळे यांच्या विजयाचा पाया तयार झाला होता. तसेच मराठा शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे यांनी केलेली सर्वाधिक नोंदणी हीच त्यांच्या विजयाची पायाभरणी झाल्याचे बोलले जात आहे.

पूर्वीपासूनच तिकीट निश्चित त्यामुळे नियोजनासाठी झाला फायदा

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस करून पूर्वी निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे काळे यांना तयारीसाठी खूप मोठा वेळ मिळाला .त्यामुळेच मराठवाड्यात सर्वाधिक मतदान नोंदणी त्यांच्या माध्यमातून केली गेली. तसेच गेल्या तीन टर्म मध्ये त्यांचा शिक्षकाचे असलेला वैयक्तिक संपर्क त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली.

शिक्षण संस्था ठरल्या किंग मेकर

मराठवाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिक्षण संस्था सर्वाधिक आहेत. मराठवाड्यात सहकार क्षेत्रात सहकार असो की कारखानदारी सर्वांवरच काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. भाजपकडे या संस्थांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे आघाडीकडे असलेल्या संस्था ह्या विक्रम काळाचे विजयात किंगमेकर ठरले आहेत. मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी आमचा विजय केवळ दोन दिवसात हिरावला गेला. संस्थाचालकांनी टाकलेल्या दबाव आणि शिक्षकांमध्ये निर्माण केलेली भीती यामुळेच आमचा विजय दुरावला गेल्याचा विश्वासराव यांचा आरोपच आघाडीच्या संस्थाचालकांकडे असलेली ताकद दाखवून येतो.

भाजपला दुसऱ्या पसंतीच्या मताची झाली अडचण

विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळाली त्यानंतर दुसऱ्या पसंतीच्या मताचा देखील त्यांना पाठिंबा मिळाला. काळे यांना दुसऱ्या पसंतीची 3499 मते मिळाली. तर तर किरण पाटील यांना 3154 मते मिळाली. त्यामुळे दुसऱ्या पसंतीचे मते मिळणे देखील भाजपला अवघड गेले आणि विक्रम काळेला हेच पथ्यावर पडले..

तीन टर्म आमदारकीचा झाला फायदा विक्रम काळे हे गेल्या तीनटर्म पासून आमदार आहेत. मराठवाड्यात पदवीधर आमदार देखील सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून आहे.त्यामुळे पक्षाचे असलेले नेटवर्क आणि केल्या तीन टर्म मध्ये स्वतःच असलेले नेटवर्क हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले विधानसभेचे विरोधी पक्षाचे अजित पवार यांनी औरंगाबाद परभणी आणि नांदेडमध्ये सभा देखील घेतल्या पक्षांतर्गतल्या विरोधकांना दम भरत काळे याच्यासाठी काम करण्याच्या बाबत दम ही भरला.. ..त्याचा परिणाम निकालामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे जल्लोष करताना कार्यकर्ते एकच पसंत विक्रमी पसंत अशा घोषणा देतो होते..

बातम्या आणखी आहेत...