आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:परवानगी नसताना आज खासदार इम्तियाज जलील मशिद उघडून अदा करणार नमाज, वाद उद्भवण्याची शक्यता

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळ ही बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी नाही. मात्र आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मशिद उघडून नमाज अदा करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून खासदार इम्तियाज जलील आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरू होता. धार्मिक स्थळावरुन हा वाद पाहायला मिळाता. आता आज खासदार इम्तियाज यांनी आज औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली आहे. यासोबतच जलील आज दुपारी शहागंज येथील मशिद उघडून नमाज अदा करणार आहेत. यामुळे आता खैरे आणि जलील यांच्या पुन्हा वाद निर्माण होऊ शकतो.

खैरे आणि जलील यांच्यात का झाला होता वाद?
नुकतंच खासदार इम्तियाज जलील यांनी खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी निवेदन देणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात मोठा वाद झाला होता. यामुळे औरंगाबादमधील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होते. याच पार्श्वभूमीवर आजही शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.