आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सत्ताधारी विरोधकांनी राजकारण विरहित प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत - खासदार संभाजीराजे भोसले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • 28 मे रोजी आगामी भूमिका जाहीर करणार

मराठा समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. यात राजकारण आणू नये. एसईबीसी आरक्षण रद्द झाले. आता पुढे काय करणार आहेत ते सांगा. धोरण जाहीर करावे. समाज प्रतिनिधी म्हणून मी 27 ऐवजी 28 मे रोजी माझी भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती खासदार संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुढे खासदार संभाजीराजे म्हणाले की, 30% मराठा श्रीमंत आहे. यांना 1% टक्काही आरक्षण नको. पण बहुजनांना जो न्याय तोच गोरगरीब 70% मराठ्यांना मिळायलाच पाहिजे. यापासून त्यांना वंचित ठेवण्याचे काम होत आहे. याकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाने रस्त्यावर उतरून शांततेत 58 मोर्चे काढले आहेत. 42 तरुणांनी आत्मबलिदान दिले. यामुळे सरकारला मराठा आरक्षणासह समाजाचे विविध प्रश्न माहिती आहेत. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ नाही तर सत्ताधारी व विरोधक खासदार आमदार, मंत्र्यांनी समाजासाठी काय करणार आहात हे सांगितले पाहिजे. ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. याला राजकीय रंग देऊ नये. अशी आग्रही मागणी केली.

सध्या आंदोलनासाठी योग्य वेळ नाही
कोरोना संसर्ग प्रचंड वाढलेला आहे. अशा महामारीत रस्त्यावर उतरून बांधवांना मरणाच्या खाईत लोटायचे का? असा प्रश्न उपस्थित करून ही वेळ आंदोलनाची नाही. जर राज्यकर्ते ऐकणार नसेल तर मग रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल अशी भूमिका स्पष्ट केली. 5 जून रोजी आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलन तो त्यांचा प्रश्न असून सध्या आंदोलनासाठी योग्य वेळ नसल्याचे स्पष्ट केले.

तो त्यांचा प्रश्न
चंद्रकांत पाटील, मेटे, हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर व भाजप पाठिंब्यावर संभाजीराजे यांनी तो त्यांचा प्रश्न असून त्यांना विचारावे, माझ्या बाबत बोला म्हणून बोलणे टाळले.

तज्ज्ञ, अभ्यासकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी दौरा
औरंगाबादेतून मराठा आरक्षणाची मशाल पेटली आहे. न्यायालयीन लढाई येथूनच लढली गेली आहे. त्यामुळे येथील तज्ज्ञ, अभ्यासकांचे, मराठा तरूणांची भुमिका जाणून घेण्यासाठी दौरा केला आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक, समाजाचे गाडे अभ्यासक डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशीही चर्चा केली. ओबीसी आरक्षणातील अडचण त्यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे आता एसइबीसी आरक्षण रद्द झाले पुढे काय? याचा सत्ताधारी विरोधक आदी सर्वांनी विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपणही माहिती संकलित केली. त्याबाबत सरकारला कळवेल. माझे धोरण उद्या जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले.

राजीनामा देऊन प्रश्र्न सुटणार का? मी राजीनामा देऊन मराठा समाजाला न्याय मिळणार असेल तर लगेच देतो. त्यामुळे याचं राजकारण करू नये असे ते म्हणाले.

भाजप पदाधिकाऱ्यांशी गुप्त गू
सकाळी 9 वाजेच्या दरम्यान संभाजीराजे शहरात आले होते. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, माजी महापौर बापू घडामोड , शिवाजी दांडगे आदी भाजप पदाधिकार्यांशी चर्चा केली. यामुळे राजे पुन्हा खासदारकी साठी भाजपची बोली बोलत असल्याचे अनेकांनी खरपूस टीका केली. मराठा समन्वयकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाच्या विश्वासाला पुन्हा तडा जाऊ देऊ नये, अशी माफक अपेक्षा तरूणांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...