आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा प्रभाग आरक्षण सोडतची करण्यात आली रंगीत तालीम:प्रभाग रचनेनंतर 5 ऑक्टोंबरला सोडत घेण्यात येणार

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी मनपा निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार 5 ऑक्टोबर रोजी प्रभाग रचनेतील आरक्षणाची सोडत घेण्यात येणार आहे. त्याची रंगीत तालीम 3 ऑगस्ट रोजी संत एकनाथ रंगमंदिर येथे मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांच्या समोर करण्यात आली.

मनपा निवडणुकीत नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार विविध प्रवर्गातील आरक्षणाची सोडत करण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून मनपा प्रशासनाच्या वतीने 3 ऑगस्ट सोडतची रंगीत तालीम घेण्यात आली. संत एकनाथ रंगमंदिरमध्ये झालेल्या या रंगीत तालीममध्ये एका पारदर्शक पात्रात आरक्षणाच्या चिठ्या टाकण्यात आल्या होत्या. त्या शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत बाहेर काढून त्याचे वाचन करण्यात येत होते. कोणत्या प्रकारची चूक होऊ होता कमा नये यासाठी मनपा प्रशासक अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या रंगीत तालीम प्रसंगी अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, रवींद्र निकम, उपायुक्त संतोष टेंगळे, सोमनाथ जाधव, नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, अपर्णा थेटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

नियोजनबद्ध पद्धतीने तालीम

अधिकाऱ्यांना बसण्याची आसन व्यवस्था सोडायच्या चिट्ठ्या त्याला ठेवण्यासाठीचे पारदर्शक डबे तसेच ज्या डब्यातून सोडत काढण्यात येणार आहे तोही पारदर्शी ठेवण्यात आला होता तसेच लहान मुलांच्या हाताने ती सोडत काढण्यात येत होती.

बातम्या आणखी आहेत...