आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाणी समस्येवरून औरंगाबादकर प्रचंड त्रस्त असताना आज याच मुद्द्यावरून औरंगाबाद पालिकेत जोरदार राडा झाला. पाणी समस्येबाबत पालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याची आयुक्तांसोबतच चांगलीच बाचाबाची झाली. या घटनेच्या निषेधार्थ पालिकेतील कर्मचाऱ्यांनीही आज दिवसभर कामबंद आंदोलन केले.
...आणि मनपा आयुक्त भडकले
शहरातील पाणी प्रश्नावरून नागरिक प्रचंड त्रस्त असताना, आणि पाणी प्रश्न पेटलेला आहे. आज ह्याच मुद्द्यावरून मनपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल इंगळेंनी पाणी प्रश्नासंदर्भात मनपा आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांची भेट घेतली. मात्र यावेळी इंगळे आक्रमक झाले होते. दरम्यान इंगळेंचा सहकारी मित्र हरिशचंद्र मगरे या सपूर्ण प्रकराचे चित्रीकरण करत होता. ही स्टंटबाजी पाहून आय़ुक्त चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. राहुल इंगळे आणि हरिशचंद्र मगरे या दोघांच्या विरोधात सिटी चौक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयुक्तांनी मला खेचत केबिनकडे नेल्याचा आणि माझ्या मित्राला मारहाण झाल्याचा आरोप इंगळे यांनी केला आहे. तर या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे इंगळेंनी म्हटले आहे.
शहरातील अनेक भागांत विस्कळीत पाणी पुरवठा सुरू आहे. पाणी कधी येते व जाते हे नागरिकांना माहितदेखील नसते. याबाबत नागरिक सातत्याने आपल्याकडे तक्रार करत असतात. त्यामुळे या प्रश्नांसबंधी आज आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. मात्र, आयुक्तांनी आपले निवदेनच स्वीकारले नाही व उलट अरेरावी केली, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. तसेच, या घटनेचे शुटिंग करत असलेल्या आपल्या मित्रालाच पोलिसांनी मारहाण केली. नंतर आयुक्तांनी आपल्याशी असभ्य वर्तन करत केबिनबाहेर आल्यावर आपल्याला खेचत परत केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप या सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.