आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक नियोजन:औरंगाबाद मनपाने दिली ठेकेदारांची 298 कोटी रुपयांची बिले, आता फक्त २२ कोटी रुपयांची बिले थकित

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील सहा महिन्यांत मनपाच्या लेखा विभागाकडून जवळपास २९८ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. त्यामुळे आता मनपाकडे फक्त २२ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. कोरोनामध्ये केवळ डागडुजीच्या कामाला प्राधान्य दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नियोजन केले. काही महिन्यांपूर्वी शासनाकडून आलेले संतोष वाहुळे यांनी लेखा विभागाचा पदभार घेतला. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदारांची बिले देण्यासाठी स्वतंत्र मॉडेल तयार केले. २०१७ ते २०२१ पर्यंतची बिले प्रामुख्याने दिली. मार्च महिन्यात नवीन बजेट जाहीर होईल. त्यापूर्वी मागील देणगी दिल्याने ठेकेदारांनी समाधान व्यक्त केले आहे. निवृत्त मनपा कर्मचाऱ्यांची बाकी देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्य लेखाधिकारी वाहुळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...