आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद महापालिकेत ऐनवेळीच्या ठरावांचा घोटाळा प्रकरणी, तत्कालीन महापौर, नगर सचिव व दोषी अधिकारी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
जलील यांचे आरोप
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, औरंगाबाद मनपातमध्ये सत्ताधारी, प्रशासनातील अधिकारी हे लुटारू आहेत. 2017 ते 2020 काळात तत्कालीन नगरसचिव व अन्य अधिकाऱ्यांसह महापौरांनी, कोट्यावधी रुपयांची कामे ही ऐनवेळीचा ठराव म्हणून मंजुर करून घेतली, असा आरोप केला.
अनेक कामांमध्ये गोगस पणा
खासदार जलील म्हणाले की, 220 ठरावांच्या कामाची जंत्री माझ्याकडे आहे. अतिरिक्त कामाच्यानावाने हे संगळे काही सुरू होते. यात 25 कोटींच्या रस्त्यांच्या कामाचाही समावेश आहे, असे म्हणतानाच या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार तेव्हाच्या सत्ताधारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी केला आहेए असा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.
या प्रकरणी लेखी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे जुलै महिन्यात करत चौकशीची मागणी केली होती. या नंतर 16 नोव्हेंबर रोजी महापालिका प्रशासकांना या संदर्भात पत्र प्राप्त झाले असून या ऐनवेळीच्या ठरावांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे इम्तियाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तर यावेळी बोलताना ते म्हणाले की घोटाळ्यातील आरोपींवर तर आपण हे सगळे ठराव आणि त्याचे पुरावे न्यायालयात घेऊन जावू, असा इशारा देखील दिला आहे.
शिवसेना- भाजपच्या नेत्यांनी प्रामाणिकपणा दाखवावा
खासदार जलील म्हणाले की, शिवसेना - भाजपच्या नेत्यांनी मनपामध्ये सर्वाधिक सत्ता उपभोगली आहे. त्यांनी आणि मंत्र्यांनी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी मनपा आयुक्तांना पत्र द्यायला हवे, असे आवाहन देखील केले आहे.
खासदार जलील म्हणाले की, मनपामध्ये बसलेले सगळे डाकू आहेत,नागरिकांचा पैसा लुटतात हे मी वारवांर सांगत आलो आहे. अकोला मनपाच्या अश्याच प्रकरणात राज्य शासनाकडून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पत्र आपल्या हाती लागले होते. यानंतर औरंगाबादमनपामध्ये काय प्रकार घडला यांची माहिती घेतली, यात 2017 ते 2020 मध्ये असे 220 ठराव घेण्यात आल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.