आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी'च्या पुढाकाराने अभिरूप महासभा:औरंगाबादच्या नागरी समस्यांची कोंडी फोडू; सत्ताधाऱ्यांचे आश्वासन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपाचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ व्यासपीठावर

औरंगाबादच्या नागरी समस्यांची कोंडी फोडू, असे आश्वासन दिव्य मराठीच्या पुढाकाराने आयोजित झालेल्या महापालिकेच्या अभिरूप सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सत्ताधारी पक्षाचे नेत्यांसह महापालिका आयुक्त आणि प्रशासकांनी दिले.

नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेची सर्वसाधारण सभा झालेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक समस्या, प्रश्न अनुत्तरित आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने आज या अभिरूप सर्वसाधारण सभेचे (जीबी) आयोजन केले होते.

विशेष निमंत्रित सद्स्य.
विशेष निमंत्रित सद्स्य.

दिव्य मराठीने यापूर्वीच नागरिकांना आपापल्या भागातील समस्या नगरसेवकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेकडो समस्यांची यादी प्राप्त झाली. यातून निवडक समस्यांना प्राधान्य देत त्याची विषयपत्रिका तयार करण्यात आली. त्यावर सभेत चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे आयुक्तांनीही हा उपक्रम सकारात्मकतेने घेत शहर विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिलीय.

चेतन कांबळे, अंकिता विधाते, नितीन चित्ते यांचीही उपस्थिती.
चेतन कांबळे, अंकिता विधाते, नितीन चित्ते यांचीही उपस्थिती.

या मुद्द्यांवर झाली चर्चा

पाणी, रस्ते, पार्किंग, ड्रेनेज, शाळा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, स्मार्ट सिटीने हाती घेतलेले विविध विषय, गुंठेवारी, मोकाट कुत्र्यांचा त्रास, उद्याने आदी नागरिकांनी सुचवलेल्या विषयांवर या सभेत प्रामुख्याने चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...