आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपातील अधिकारी सखाराम पानझडे अखेर सेवानिवृत्त:दीड वर्ष होते अभियंता पदावर, अविनाश देशमुख सांभळणार पुढील पदभार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपातील सर्वाधिक चर्चेतील अधिकारी सखाराम पानझडे यांना अखेर 26 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती मिळाली. सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांना तीनदा मुदतवाढ मिळाली. निवृत्तीनंतरही त्यांनी दिड वर्ष शहर अभियंता पदावर काम केले. 31 डिसेंबर मुदत संपल्यानंतर त्यांचा पदभार नगररचना उपसंचालक अविनाश देशमुख यांच्याकडे अतिरीक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडी विद्युत विभागाचा पदभार कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांच्याकडे देण्यात आला आहे.

सखाराम पानझडे त्यांच्या सेवेत कायम चर्चेत होते. कनिष्ठ अभियंता ते मनापात रुजू झाले 2012 पासून त्यांच्याकडे शहर अभियंता पदाचा कार्यभार होता. मनातील वरीष्ठ अधिकाऱ्यां बरोबर शहरातील लोकप्रतिनिधींशी ही त्यांचे चांगले सबंध होते. शेवटच्या टप्यात 24 कोटीचे रस्ते प्रकरण आणि त्यांनतर हर्सुल तलावातील गाळ या प्रकरणात त्यांची चौकशी लागली होती. या दोन्ही प्रकरणात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.

जून 2021 रोजी ते महापालिकेतून सेवानिवृत्त झाले. मात्र दुसरे अधिकारी नसल्यामुळे तत्कालीन आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी त्यांना सुरुवातीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर याच प्रमाणे त्यांना दोनदा सहा सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. अखेर शेवटच्या आमदार प्रशांत बंब यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कारभार आणि पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर शासनाने त्यांची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. शेवटच्या टप्यातही पानझडे यांच्या मुदतवाढीची चर्चा होती. मात्र चौकशी पार्श्वभुमीवर त्यांनी अखेर सेवा निवृत्तीच स्विकारल्याची चर्चा आहे.

या प्रकल्पात महत्वाची भुमिका

मागच्या 20 वर्षातील मनपाने केलेले अनेक मोठ्या प्रकल्पात सखाराम पानझडे यांची महत्वाची भुमिका होती. त्यात प्रामुख्याने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, 152 कोटीचे रस्ते तयार करणे, संत एकनाथ रंगमंदिराचे नुतणीकरण करणे, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्यानाची निर्मिती, स्मार्ट सिटीतून होणाऱ्या 317 कोटीच्या रस्त्यांना तांत्रिक मान्यता देणे यात त्यांची महत्वाची भुमिका होती. या शिवाय स्मार्ट सिटीचे नोडल ऑफीसर म्हणूनही त्यांच्याकडे पदभार होता.

बातम्या आणखी आहेत...