आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत खून:आईसमोर अपशब्द वापरल्याने तरुणाने केली मित्राची हत्या; औरंगाबादच्या संजयनगर परिसरातील धक्कादायक घटना

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई समोर अपशब्द वापरल्याने संतापलेल्या तरुणाने मित्राची धारदार चाकूने वार करत हत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संजयनगर येथील गल्ली नंबर 7 मध्ये घडली. भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली. मंगेश दिनकर मालोदे (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुऱ्या शेख अहेमद (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भुऱ्या हा पोलिस रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

भांडणानंतर माफी मागितली होती, मग...

मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राहणाऱ्या आरोपी भुऱ्या सोबत त्याची मैत्री होती. 21 जुलै रोजी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपी भुऱ्याने गुरुवारी मंगेशच्या घरी जाऊन मंगेश व त्याच्या वडिलांची माफी मागितली. त्यानंतर दोघेही पुन्हा आधीसारखेच मैत्रीपूर्ण बोलायला लागले होते. पण, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मंगेश गल्लीच्या चौकातील ओट्यावर बसलेला असताना भुऱ्या त्याच्या आईसह तेथे आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला.

आईसमोर शिवीगाळ करत असल्याच्या रागात हत्या

मंगेश यावेळी खूप रागात होता. रागाच्या भरात तो भुऱ्याशी वाइट शब्दांत बोलत होता. आपल्याच आईसमोर मंगेश असे सुनावत असल्याने भूऱ्याच्या पारा चढला. त्याने कोणताही विचार न करता स्वतः जवळील धारदार चाकू काढला व मंगेशला त्याच ठिकाणी भोसकले. मंगेश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्याचे पाहून भुऱ्याने तेथून पळ काढला. मंगेश रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत असल्याचे पाहून स्थानिकांनी त्याला रिक्षातुन औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री मंगेशची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी भुऱ्याला अटक केली. यानंतर शुक्रवारी सकाळी पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे आणि जिन्सी पोलिसांनी घटनस्थळाची पाहणी केली. याबाबत सविस्तर तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...