आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयातून पतीने काढला पत्नीचा काटा:डोक्यात लोखंडी रॉड मारुन केला खून, औरंगाबादेतील घटना

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमधून एक धक्कादयक घटना समोेर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना वाळूज औद्योगिक परिसराला लागूनच असणाऱ्या घाणेगावात उघडकीस आली. तसेच ही घटना गुरुवारी (8 डिसेंबरला) सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. संबंधिक प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दोघांमध्ये अनेक दिवसांपासून होता वाद

वाळूज औद्योगिक परिसराला लागूनच असणाऱ्या घाणेगावतील संघर्ष नगरमध्ये संतोष प्रभाकर जाधव (वय,35) हा पत्नी लक्ष्मीबाई (वय 36) आणि 13 वर्षाच्या मुलासोबत वास्तव्यास आहे. मागील काही दिवसांपासून दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. वादाचे कारण पत्नी लक्ष्मीचे आपल्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीसोबत शारीरिक संबंध असल्याचा पती संतोषला संशय होता. यावरून तो पत्नीला वारंवार शिवीगाळ करत असत.

घटनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी याच कारणातून दोघा पती पत्नीमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पतीच्या संशयी प्रश्नांवर पत्नी प्रतिउत्तर देऊ लागली. यातून अधिकच कडाक्याचे भांडण झाले. परिसरातील नागरिकांना हे नेहमीचे असल्याने याकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. पुढे संतापलेल्या संतोषने त्याच्या हातात पडलेल्या लोकांडी रॉडचा जोरदार दणका पत्नी लक्ष्मीबाईच्या डोक्यावर घातल्याने ती रक्तबंबाळ होऊन जागीच निपचित पडली होती.

आरोपी पती ताब्यात

संबंधित घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळताच पोलिसांना निरीक्षक गुरमे यांनी पोलिस उपनिरीक्षक स्वाती उचित, शेकनाथ आधाने, राहुल निर्वळ, अशोक इंगोले, धनराज राठोड, पोलिस कर्मचारी किशोर घुसले, राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे, फिरोज तडवी रोहित चिंधडे आदींना सोबत घेत घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच आरोपी पतीला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने चांगलीच गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...