आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरूर कासार:सोने खरेदीच्या बहाण्याने बोलावून सराफाचा खून; दुचाकीवरून मृतदेह नेऊन पुरला

शिरूर कासार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खुनानंतर विशालचा मृतदेह गोधडीत लपेटून दुचाकीवर ठेवून भातकुडगाव येथील आरोपीच्या शेतात पुरला होता.

सोने खरेदीचा बहाणा करून बोलवून घेऊन सराफा व्यापारी तरुणाचा खून केल्याची घटना शिरूर कासार येथे घडली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी फरार आहे. विशाल सुभाष कलथे (२५) असे खून झालेल्या सराफाचे नाव आहे. विशाल कुलथे याचे शिरूरमध्ये सोने, चांदीचे दुकान आहे. भाऊ व तो हा व्यवसाय करतात. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड हा त्यांचा मित्र असून त्याचे शिरुरमध्येच सलूनचे दुकान आहे. तो विशालकडून सोने खरेदी करत असल्याने त्यांच्यात मैत्री होती. ज्ञानेश्वरने माझे लॉकडाऊनमध्ये लग्न झाले आहे.

जास्तीचे सोन्याचे दागिने करायचे आहेत. असे सांगून त्याने सोन्याची ऑर्डर दिली व ते झाल्यानंतर गायकवाड याने दागिने घेऊन त्यास सलूनमध्ये बोलावले. तेथे ज्ञानेश्वरचे दोन साथीदार केतन संतोष लोमटे (१९, रा. भात कुडगाव ता. शेवगाव) आणि धीरज अनिल मांडकर (१९, रा. पाथर्डी ) हे होते. विशालने याने सोने आणल्याची खात्री पटल्यानंतर या तिघांनी त्याचा आधी गळा दाबला व नंतर त्याच्या मानेत सलून मधील कात्री खूपसून त्याचा खून केला. खुनानंतर विशालचा मृतदेह गोधडीत लपेटून दुचाकीवर ठेवून भातकुडगाव येथील आरोपीच्या शेतात पुरला होता. तो पोलिसांनी उकरून बाहेर काढला.

बातम्या आणखी आहेत...