आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेमार्ग:2 मार्चपासून औरंगाबाद - नगर रेल्वेमार्ग सर्व्हे, दिव्य मराठी टॉक शोमध्ये उद्योजकांनी केली होती मागणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक विकासाला उपयुक्त ठरणाऱ्या औरंगाबाद – अहमदनगर रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणास मंगळवारपासून (२ मार्च) प्रारंभ होत आहे. मध्य रेल्वे मुंबईचे पथक त्यासाठी सोमवारी शहरात दाखल होत आहे.

मध्य रेल्वेचे हे पथक तीन दिवसांत औरंगाबाद जिल्हा तसेच मार्गावरील संभाव्य तालुक्यांचा आढावा आणि मनमाडमध्ये सर्वेक्षण करणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. हे पथक अहमदनगर, नेवासा तसेच शनिशिंगणापूर येथेही जाणार आहे.शनिशिंगणापूरला ते भाविकांशीही चर्चा करणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांसंबंधी माहिती देऊन गती देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. तीन आठवड्यांपूर्वी ‘दिव्य मराठी’ने आम्ही औरंगाबादचे लोक अभियानात औरंगाबाद फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांना टॉक शोसाठी निमंत्रित केले होते. त्यात उद्योजक ऋषी बागला यांनी औरंगाबाद परिसराच्या विकासासाठी जालना ते पुणे रेल्वेमार्ग अत्यंत गरजेचा आहे, असे सांगितले होते. या मार्गामुळे जालना, शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद रेल्वेस्टेशन, वाळूज, सुपा, पुणे औद्योगिक वसाहती जोडल्या जातील. लाखो जणांना रोजगार मिळेल, असेही त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार हालचाली सुरू झाल्या आहेत.

तर... ४ तासांत पुणे
औरंगाबाद-पुणे सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वेला पत्र पाठवले होते. त्याला प्रतिसाद मिळाला. शंभर वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या जालना - खामगाव रेल्वेमार्ग सर्वेक्षणाचेही आदेश निघाले आहेत. सध्या औरंगाबादेतून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे आधी मनमाडला जाऊन परत मागे वळते. त्यात सात तास खर्ची पडतात. नवीन मार्ग अमलात आला तर चार तासांत पुणे गाठता येईल, असे दानवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...