आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी प्रशासनाने 15 डिसेंबरपासून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृृद्धी महामार्गावर औरंगाबाद ते नागपूर बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही महानगराच्या मध्यवर्ती बसस्थानकातून रात्री 10 वाजता बस सुटेल व पहाटे साडेपाच वाजता पोहोचतील.
4 तासांची बचत
औरंगाबादेत सिडको व जालना हे दोनच थांबे असल्याने सरळ मार्गाच्या तुलनेत समृृद्धी महामार्गवरून चार तास अगोदर म्हणजे आठ तास प्रवासासाठी लागणार आहेत. तसेच, प्रतिप्रवासी भाड्यात ४० रुपयांची बचतही होणार असल्याने प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किमीच्या टप्प्याचे रविवारी (११ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे महामार्गवरून प्रवासाला सुरुवात झाली आहे. एसटी महामंडळाच्या बससेवाही या मार्गावरून धावणार आहेत. शिर्डी-नागपूर प्रमाणेच औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानाकातून व नागपूर येथून औरंगाबादसाठी दोन बससेवा १५ डिसेंबरपासून सुरु होत आहे.
थांबे कमी, कमी वेळेत चांगली, सुरक्षित, किफायतशीर दरात सेवा मिळणार असल्याने प्रवाशांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे उद्योग, व्यवसाय, पर्यटन, शिक्षण, देव दर्शन, आदीला चालना मिळण्यासही हातभार लागेल. प्रवासी वाढ होऊन एसटीचे उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
प्रति प्रवासी ४० रुपये बचत
सरळ मार्गे १०१५ रुपये भाडे आहे. तर, समृद्धी मार्गे प्रवास केला तर ९७५ रुपयेच भाडे लागेल. लहान मुलांसाठी ४९० रुपये हाफ तिकिटाचा दर आहे. म्हणजेच प्रतिप्रवासी ४० रुपयांची बचत होणार आहे.
दोनच थांबे
औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकातून सिडको व जालना असे दोन थांबे असून त्यानंतर थेट नागपुरलाच बस थांबेल.
बस सुटण्याची व पोहोचण्याची वेळ
आगाऊ बुकिंगची सोय
औरंगाबाद व नागपूर येथून एक एक बस धावणार आहे. त्यामुळे आगाऊ सिट बुकिंगसाठी एसटी प्रशासनाने https://msrtc.mahaonline.gov.in या वेबसाइटवर आणि मोबाइल अॅपची सोय उपलब्ध करून दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.