आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे व ते सर्वाना समान न्याय देतील अशी आमची भावना होती. मात्र या नावाकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील समर्थन आहे अशी आमची भावना झाली असून त्यामुळे आम्ही पन्नास पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पदाबाबतचा राजीनामा दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व विधानसभा अध्यक्ष जावेद खान यांनी सुभेदारी विश्राम गृहवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
जावेद खान म्हणाले की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होतो. मात्र सध्या स्थितीत औरंगाबाद शहराचे ऐतिहासिक नाव व महत्त्व असतांना फक्त सत्तेच्या लोभापायी राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद नामकरणच्या ठरावाला सहमती दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष नसून तो एका विशिष्ट वर्गाला घेऊन जाणारा पक्ष आहे अशी आमची खात्री झाली. त्यामुळे आम्ही आज आमच्या सर्व पदाचा राजीनामा देत आहोत असे पत्रच जावेद खान यांनी पक्षाकडे दिले आहे.
पक्षाच्या नेत्यांमध्येच संभाजीनगर नावासाठी आग्रह
जावेद खान यांनी सांगितले की आमच्या पक्षांमध्येच काही नेत्यांमध्ये छत्रपती संभाजी नगर या नावासाठी आग्रह होता त्यामुळेच नामांतराच्या वेळेस पक्षातल्या लोकांनी त्यासाठी पाठिंबा दिला तसेच काही लोक छत्रपती संभाजी नगर हे लिहित देखील असल्याचे खान यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेवर नाराज होऊन आम्ही हा राजीनामा देत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी मध्ये जाणार आहे का असे विचारले असता आम्ही याबाबत कुठलाही राजकीय निर्णय घेतलेला नाही मात्र एमआयएमच्या वतीने शहराच्या नामांतराबाबत सुरू असलेल्या लढ्याला आमचा पाठिंबा असल्याचे खान यांनी सांगितले. यावेळी कलीम शेख अमिर,आफताब जावेद खान यांच्या सह विविध पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.