आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूकीतील पराभव लागला जिव्हारी:औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला; प्रकृती चिंताजनक

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने 7 जणांनी औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला केला आहे. यात त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणी बिडकीन पोलिसांमध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी भाऊसाहेब तरमळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात अनिकेत अशोक नागे, राजु बनकर,आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकुडजळगांव असे संशयित आरोपींचे नावे आहेत.

पूर्व वैमनस्यातून हल्ला

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्या आईने बोकुड जळगावच्या सरपंचपदासाठी निवडणुक लढवली होती. यात त्या विजयी देखील झाल्या, याच निवडणुकीचा राग मनात ठेवून विरोधी गटातील काही कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब यांच्याशी शनिवारी रात्री वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद सुरू असतानाच विरोधी गटातील एका तरुणाने हातातील चाकुने भाऊसाहेब तरमळे यांच्यावर शनिवारी रात्री अचानक हल्ला केला. भाऊसाहेब यांच्या डोक्यावर, मानेवर चाकुचा मार लागला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात सात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळतात बिडकीन पोलिस ठाण्यातील पथकाने बोकुड जळगाव गावात धाव घेतली. या वादानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळेत पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली.

बातम्या आणखी आहेत...