आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:लसीकरण वाढीसाठी मंगळवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन, प्रत्येक गोष्टीत आघाडीवर असलेल्या जिल्ह्याची लसीकरणाच्या बाबतीत मात्र पिछाडी!

प्रतिनिधी । औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात औरंगाबाद जिल्हा देशभरात खालून 46 जिल्ह्याच्या यादीत, राज्यात 26 तर मराठवाड्यात आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेहमीच प्रत्येक गोष्टीत आघाडीवर असलेल्या जिल्ह्याची लसीकरणाच्या बाबतीत मात्र पिछाडी पाहायला मिळत आहे.

लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह, जिल्हा परिषदेने देखील आता मोठ्या प्रमाणावर पावले उचलली आहे. यासाठी येत्या मंगळवार दि. 16 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये दोन मतदार केंद्र मिळून एका विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. यामध्ये लसीकरणाच्या बाबतीत ग्रामसेवक, सरपंच यांना विशेष सूचना देण्यात येणार आहे. दोन्ही लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पुढील लाट कशी येईल सांगता येत नाही त्यासाठी जिल्ह्याचे 100 टक्के लसीकरण आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी यांनी सांगितले.

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी जिल्ह्यातील लसीकरणाच्या बाबतीत चिंता व्यक्त केली. यावेळी माहिती देताना गटणे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये जवळपास 18 वर्षांच्यावरील लसीकरणासाठी पात्र 21 लाख लोकसंख्या आहे, यापैकी फक्त साडेबारा लाख नागरिकांनी पहिला तर अडीच लाख नागरिकांनीच दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्याचे प्रमाण हे 50 टक्क्यांच्या घरात आहे. तर दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण हे 20 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याची खंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यापुढे स्थायी समितीच्या सभेत व्यक्त केली.

यावेळी बोलताना गटणे म्हणाले की, मागील दोन्ही लाटेत जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पुढील लाट कोणत्या स्वरूपात येईल सांगता येत नाही, त्यामुळे 100 टक्के लसीकरण गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधी पूर्ण टाकतीने सहभागी होत नाही तोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही. येत्या मंगळवारी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत लसीकरण वाढीसाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांची ट्रेनिंग घेऊन त्यांना पूर्ण प्लॅनिंग समजावून सांगन्यात येणार असल्याचे गटणे यांनी सांगितले. लसीकरण नसेल तर सार्वजनिक कोणतीच सुविधा उपलब्ध होणार नाही. लसीकरण न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार मिळाला परंतु पुढील पगार मिळणार नसल्याचेही गटणे यांनी स्पस्ट केले.

20 टक्के फ्रंटलाईन वर्करांचे लसीकरण नाही
कोरोनाच्या सुरुवातीपासून आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत अन्य विभागाचे कर्मचारी देखील फ्रंटलाईनवर कोरोनाशी लढा देत आहे. यामुळे लस येताच सर्वात आधी यांना लस देऊन त्यांचे 100% लसीकरण पूर्ण करण्याच्या सरकार आणि आरोग्य विभागाच्या सूचना होत्या. असे असले तरी मात्र आज घडीला 20 टक्के फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी पहिला डोस देखील घेतलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...