आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मागील वर्षी शाळा गणवेशाची पूर्ण खरेदी झालीच नाही, कोरोनाचे नाव पुढे करत यंदाही विद्यार्थी गणवेशाविनाच का?

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन ऐवजी एकच गणवेश, मागील वर्षी फक्त पाचवी ते आठवीच्या 58 हजार 402 जणांनाच गणवेश दिले

समग्र शिक्षा अभियांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेतून गणवेश देण्यात येतो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळाच सुरु नाही. खर्चात कपात करत दोन ऐवजी एकच गणेवश विद्यार्थ्यांना देण्यात येणार होते. परंतु पुन्हा कोरोनाचे कारण करत मागील वर्षी खरेदीच झाली. त्याचे पैसे आता जमा झाले असून, यंदा देखील शैक्षणिक सत्र नेमके कधी सुरु होणार? शाळा सुरु झाल्या नाही तर गणवेश मिळेल की नाही असे प्रश्न निर्माण केले जात असून, यंदा देखील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार का? असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. ती पुरेसा निधीच नसल्याचा दावा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

समग्र शिक्षा अभियांतर्गत जिल्हा परिषद, एससीएसटी, दारिद्रयरेषेखालील पालकांच्या पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या पाल्यास व सर्व विद्यार्थीनींना शालेय गणवेश देण्यात येतो. प्रती गणवेश तीनशे रुपये असे दोन गणवेशासाठी तीनेश रुपये देण्यात येतात. मात्र, मागील शैक्षणिक वर्षात संपूर्ण गणवेश खरेदी झालीच नाही. मुलांना एकच गणवेशासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यासाठी समग्र शिक्षा अभियांतर्गत १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. या निधीतून पाचवीते आठवीच्या एकूण ५८ हजार ४०२ मुलांना गणवेशाचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र पहिली ते चौथीचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित -
पहिली ते चौथीचे वर्गच सुरु झाले नाही. ते कधी सुरु होतील याबाबत स्पष्टता नसल्याने या विद्यार्थ्यांना मागील वर्षी गणवेशच देण्यात आले नाहीत. केवळ पाचवी ते आठवीच्या ५८ हजार ४०२ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले. तर शाळा सुरु होवू न शकल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या एकूण ८७ हजार ९१५ लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप झालेच नाही.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मागची खरेदीची प्रक्रिया झालेेली नाही. शिवाय एकच गणवेश देण्यात येणार होता. परंतु शाळाही भरल्या नाही. १ जूनच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अस्पष्टता आहे. सूरप्रसाद जयस्वाल जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी

अशी आहे आकडेवारी -

  1. पाचवी ते आठवीच्या ५८,४०२ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला
  2. पहिली ते चौथीची एकूण विद्यार्थी संख्या ८७ हजार ९१५
  3. मुली - ४२ हजार १६१, मुलांची संख्या १४ हजार २४१

शासनाने भेदभाव न करता समानतेचे तत्व अंगीकारत सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिलेच पाहीजेत ही शिक्षक संघाची कायम आग्रही भूमिका आहे. २०२०-२१ या गत शैक्षणिक वर्षाच्या गणवेशाचा निधी मुख्याध्यापकांना शैक्षणिक वर्षाअखेरीस एप्रिलमध्ये मिळाला.त्यातही दूजाभाव होऊन इयत्ता ५ ते ८ च्याच विद्यार्थ्यांना एका ड्रेसचा निधी मिळाला.इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांबाबत हा एक प्रकारचा अन्यायच आहे. राजेश हिवाळे - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

बातम्या आणखी आहेत...