आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास गायकवाड यांची मोहिम हुकली:माउंट आकांकगुआ शिखराची 6300 मीटर उंची गाठली, पण भयंकळ वादळामुळे परतले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी मोहिम प्रत्येकाला आयुष्याचा सर्वात मोठी शिकवण देऊन जाते. मोहिम यशस्वी झाली की नाही, किती उंची गाठली, काय त्रास झाला, या सर्व बाबी खूपच खुज्या ठरतात. जगभर सर्वात मोठ्या साहसी मोहिमा आयोजित करणारी ३६० एक्सप्लोरर कंपनी व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी आयोजित केलेली "माउंट आकांकगुआ’ या आंतरराष्ट्रीय मोहिम अंबादासने साहसीपणा दाखवत ६३०० मीटरवर चढाई केली. खराब वातावरण व वेगवान वऱ्यामुळे अवघ्या ६६२ मीटर उंची बाकी असल्याने मोहिम फत्ते होवू शकली नाही.

गिर्यारोहनातील आजकालचे मॅच्युअर उदाहरण म्हणून यांच्याकडे पाहता येईल. दक्षिण अमेरिकेतील माउंट आकांकगुआ शिखरावर सतत येणारे वादळ ८५-९० ताशी वेगाने वाहणारे वारे हे येथील चढाईत सर्वात मोठी अडचण ठरते होती. पुढील चढाईत सर्व काही चांगले सुरू असताना कॅम्प-२ च्या जवळ अचानक वातावरण खराब झाले. त्यामुळे अनेक टीम माघारी निघाल्या होत्या. सर्व टीम खाली येत असताना अंबादास गायकवाड व इतर टीम मेंबरनी चढाई सुरू ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला.

जवळपास ४ दिवस भयंकर वादळात कॅम्प-१ वर दोन दिवस तंबूत बसून काढले. हा सर्वात अवघड कालावधी होता. अशा परिस्थितीत सर्वांनी संयमाने निर्णय घेतला. एक चुकीचा निर्णय आणि सर्व सदस्यांचा जीवावर बेतणारा होता. वादळाची पर्वा न करता अंबादास गायकवाड यांनी चढाई पुढे सुरू ठेवली व कॅम्प-३ ला मुक्काम करून समिट पुश सुरू केला. परंतु उने तापमान वेगाने वाहणारे वारे व खराब हवामान मुळे गाईडने हा समिट पुश थांबवून मागे येण्याचा निर्णय घेतला.

गारठवणारे उणे -२० ते -२५ तापमान

या मोहिमेत गायकवाड यांनी कणखरपणा दाखवत अत्यंत हुशारीने उणे -२० ते -२५ तापमानात ६३०० मीटरचा पल्ला गाठून भारतीय तिरंगा ध्वज व अर्जेन्टिना देशाचा ध्वज फडकवला. खराब हवामान मुळे उर्वरित ६६२ मीटर चढाई पूर्ण न करू शकल्यामुळे अंबादास जास्त भावूक झाला होता. त्यांनी गाइडला विनंती करून आणखी एक संधी घेण्याचा विचार मांडला. परंतु, वातावरण आणखी खराब होणार असल्याने मोहिम थांबवावी लागली. या माेहिमेसाठी अंबादासला उद्योग मंत्री उदय सामंत, एमआयडीसीचे सीईओ विपीन शर्मा, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी नितीन दळवी, निलेश पोतदार, अमित हुत्तेकर, व आ. चेतन गिरासे तसेच एमआयडीसी मंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...