आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर प्रभारी राजेश राठोड म्‍हणाले:काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सेनेची शिकवणी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचा जन्म शिवसेनेच्या आधीचा, पण औरंगाबादमध्ये काँग्रेसला शिवसेनेची शिकवण दिली जातेय. शिवसेना औरंगाबादमधून मराठवाड्यात पोहोचली त्याप्रमाणे काँग्रेसनेही महापालिकेत सत्ता आणावी आणि मराठवाड्यात पोहोचावे, असा सल्ला शहर प्रभारी राजेश राठोड यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला. प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल शहर काँग्रेस अध्यक्ष युसूफ शेख यांनी त्यांचा सत्कार केला. त्या वेळी ते बोलत होते. झेंडावंदनाच्या फोटोचा संदर्भ देत मी पाहिले, इथे कुणालाही मागे राहण्याची इच्छा नाही, प्रत्येकाला पुढे जायचे आहे, मात्र काँग्रेसचा हाथ से हाथ मिलाओ हा कार्यक्रम नेत्यांना कार्यकर्ता बनवण्याचा कार्यक्रम असल्याचा उपदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. झेंडावंदनाच्या कार्यक्रमात फोटोसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकच झुंबड केली होती. शिवसेनेचे मोरेश्वर सावे आणि चंद्रकांत खैरे शहरात निवडून आले आणि नंतर मराठवाड्यात शिवसेना वाढली, त्याप्रमाणे काँग्रेसनेही शहरात काम करावे, पण लक्ष्य मराठवाड्यात काँग्रेस मजबूत करण्याचे ठेवावे, असे ते म्हणाले. या वेळी काँग्रेस महासचिव जफर शेख, पवन डोंगरे, अरुण शिरसाठ उपस्थित होते.

आमदार राठोडांचे सल्ले { सर्वसामान्यांच्या दारापर्यंत जा { पदाधिकाऱ्यांनी मनभेद सोडा { गटातटाचे राजकारण संपवा { संघटनेचे काम करा { काँग्रेसची जुनी ताकद पुन्हा आणा

बातम्या आणखी आहेत...