आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर पावसाळा जवळ आल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने त्यांची पुर्वतयारी करण्यात येत आहे.मान्सुनपुर्व तयारीचा आढावा घेण्यात येणार असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे.
सातत्याने बोटी व लाईफ जॅकेटवर खर्च करणाऱ्या प्रशासनाने संभाव्य आपत्ती निवारणासाठी यावर्षी तब्बल ४ कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक स्ट्रेचर, डिजास्टर मॅनेजमेंट किट आदी साहित्य खरेदी केले आहेत.विशेष म्हणजे या मध्ये खरेदी केलेले ८१५ स्ट्रेचर हे एक क्विटंल ओझे उचलणारे पाण्यात तरंगणारे आणि फोल्डीग असलेले स्ट्रेचर आहेत.गेल्या काही वर्षातील आपत्ती निवारणासाठी करण्यात येणारा हा मोठा खर्च आहे.
अवकाळी पावसाचा जोर
जिल्हा प्रशासनाकडून यापुर्वी मल्टिस्ट्रेचरसाठी पाच वर्षांपुर्वी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते, त्यानंतर करण्यात आलेला हा मोठा खर्च आहे. सध्या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर असला तरी येत्या काही दिवसांमध्ये मान्सून बरसणार असून, संभाव्य आपत्ती निवारणासंदर्भातील नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे.
जिल्हा नियोजन समितीमधून निधी जिल्ह्यात विविध नदीकाठी असलेले १६५ गावे हे पूरप्रवण गावे असून या गावांना पुराचा धोका संभवतो. या गावांमध्ये संभाव्य धोका पाहता प्रशासनाकडून पूर तसेच इतर आपत्तीमध्ये उपयोगी पडणारे साहित्य खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.
खरेदीचे आदेश
यामध्ये आपत्तीच्या परिस्थितीमध्ये पाण्यात फोल्ड होणारे व १ क्विंटल ओझे घेऊन तरंगण्याची क्षमता असलेले ८१५ फोल्डींग व फ्लोटेबल मल्टी स्ट्रेचर, २१५ डिझास्टर मॅनेजमेंट किट, ८१५ फ्लोटिंग स्ट्रेचर तसेच ८१५ फ्ल्युड बॉडी कव्हर बॅग हे तब्बल चार कोटी रुपये खर्च करुन साहित्य खरेदी करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीतुन मंजूर केलेल्या निधीतून आपत्तीप्रसंगी उपयोगात येणाऱ्या साहित्याची खरेदी आदेश नियुक्त संस्थेस दिले आहेत.
कन्नड तालुक्यात सर्वाधिक गावे जिल्ह्यात सर्वाधिक ४८ पुरप्रवण गावे ही कन्नड तालुक्यातील आहेत. तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १६, पैठण १५, फुलंब्री ७, वैजापूर ३१, गंगापूर २६, खुलताबाद ६, सिल्लोड १० व सोयगाव तालुक्यातील ६ अशा एकुण १६५ गावांचा समावेश आहे.
साहित्य महिन्याभरात पोहोचणार
मे अखेर साहित्य पोहोचणार गावात, प्रात्यक्षिक घेणार जिल्हाप्रशासनाकडून आपत्ती निवारण विभागाअंतर्गत खरेदी करण्यात येणारे हे साहित्य येत्या महिन्याभरात जिल्ह्यात पोहोचणार आहे. त्यानंतर आपत्तीप्रवण असलेल्या सर्व १६५ गावांमध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्या- त्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हे साहित्य संबंधित गावांना देण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.