आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि.प. अधिकाऱ्यांचे मास्क तोंडावर नव्हे हनुवटीवर:मुख्यमंत्र्यांच्या "माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या महत्वाकांक्षी उपक्रम राबविणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनाही मास्क कसा वापरावा, याचा विसर

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव म्हणून सर्वांना मास्क तोंडाला लावणे बंधनकारक करण्यात होते. आता त्याचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाइन्सनुसार आणखी काही काळ मास्क लावणे आवश्यक असणार आहे. असे असतांना मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सभेत मात्र नाका आणि तोंडावर नव्हे तर हनुवटीवर मास्क ठेवतात एवढेच नाही तर काही सदस्य विनामास्क वावरतात. हीच पद्धत सर्वसामान्यांसह अधिकाऱ्यांमध्येही आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारींही असेच दिसून आले. या प्रकारामुळे जबाबदार व्यक्तीच असे वागत असले तर इतरांना कुणाचा आदर्श घ्यावा असा प्रकार जि.प.त दिसून आला.

जिल्हा परिषदेत शुक्रवारी दि. ८ जानेवारी रोजी स्थायी समितीची सभा झाली. या सभेला उपस्थित असलेल्या काही सदस्य आणि अधिकाऱ्यांना कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या गाईडलाइनचा विसर पडल्याचे दिसून आले. सभेला उपस्थित असलेल्या जि.प. अध्यक्षा मीना शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे मास्क घालून बसलेले होते. परंतू उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड यांच्यासह काही सदस्य विना मास्क होते. मुख्यमंत्र्यांच्या "माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या महत्वाकांक्षी उपक्रम राबविणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनाही मास्क कसा वापरावा, याचा विसर पडला आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे तेही आता हनुवटीवर मास्क ठेवून वावरत होते. तास दीडतास चाललेल्या या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, कार्यकारी अभियंता श्रीकांत मांगूळकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांचेही मास्क तोंडावर नव्हे तर खाली होते.

ऑनलाइन सभेला विरोध करत, शासनाकडे सभागृहात सभा घेण्याची परवानगी मागण्यात आली होती. शासनानेही अटीच्या आधारे हि परवानगी दिली आहे. कोविड-१९ च्या अनुषंघाने निर्गमित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून पूर्वीप्रमाणे सभा घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी सुहास जाधवर यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. ८ जानेवारीच्या स्थायी समितीच्या सभेत मात्र आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यांच्यासह अधिकारी, सदस्यांनी हे नियम मोडले.

सुरक्षेसाठी मास्क वापरलेच पाहिजे. जर तुम्ही कापडी मास्क वापरत असाल तर ते स्वच्छ धुवून त्याचा पुर्नवापर करता येतो. मास्क हे नेहमीच तोंंड आणि नाकावर असले पाहिजे. परंतु जि.प. स्थायी सभेत तर उपाध्यक्ष, पदाधिकारी यांच्या तोंडाला मास्क नव्हते. शिवाय तुमचे मास्क देखील खाली होते यावर जि.प. आरोग्य अधिकारी म्हणाले की, मास्कने गुदमरल्यासारखे होते. म्हणून खाली मास्क ठेवतो. सदस्य उशीरा आल्याने त्यांना आमच्या कर्मचाऱ्याने मास्क दिले होते.

बातम्या आणखी आहेत...