आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:सिल्लोडमध्ये आढळला झाडावर लटकलेला मानवी सांगाडा, मृताच्या खिशात मोबाईल, आधारकार्ड आणि डायरी सापडली

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सदरील व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे

सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील मुर्डेश्वर शिवारामध्ये एका सागाच्या झाडाला मानवी देहाचा सांगाडा लटकेला आढळ्याने खळबळ उडाली आहे. सकाळी दहा वाजेदरम्यान परिसरातील वनमजूर जंगलात गस्त घालत असताना त्याला सागाच्या झाडाला मानवी देहाचा सांगाडा लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वनमजूराने ही माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रल्हाद मुंढे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली. यावेळी सागाच्या झाडाजवळ मृताच्या शर्टच्या खिशात मोबाईल आधारकार्ड व डायरी सापडली आहे. आधारकार्वरून मृत व्यक्ती ही सिल्लोड तालुक्यामधील मोढा बु. येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरील व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदरील मृत व्यक्तीचे नाव शंकर पांडु महाकाळ (वय 75, रा. मोढा, ता. सिल्लोड) हे 15 एप्रिल रोजी मोढा येथून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली होती.

बातम्या आणखी आहेत...