आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादेत मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या ढगफुटी सदृष पावसाने शहरातील रस्ते हे पाण्याने तुडुंब भरले होते. यासोबतच नद्या नाले ओसंडून वाहत आहे. खाम नदी देखील तुडुंब भरली आहे.
हिमायत बागेतील धबधबा पावसामुळे प्रवाहित होऊन खळखळून वाहायला लागला आहे. क्वचितच दिसणारे हे सुंदर दृष्य पाहून औरंगाबादकर सुखावले आहेत.
हर्सुल तलाव ओव्हरफ्लो, रात्री एक वाजता सांडव्यातून पाणी, खामनदी पात्रात...।
मंगळावारी औरंगाबाद शहरात झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला झोडपून काढले. या ढगफुटीसदृश पावसामुळे हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तर रात्री एक वाजता सांडवयातून पाणी, खामनदी पात्रात वाहत होते.
यंदाच्या मोसमातील हा पहिला जाेरदार पाऊस
यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच औरंगाबादेत मंगळवारी सायंकाळी पावसाचे ढगफुटीसारखे रौद्ररूप दिसून आले. सायंकाळी मात्र 7.10 ते 8.10 या तासाभरात मेघगर्जनेसह ढगफुटीसारखा प्रचंड वेगाने पाऊस झाला. यात पहिल्या 30 मिनिटांत ताशी 166.75 मिमी वेगाने 56.2 मिमी पाऊस पडला, तर रात्री 8.30 पर्यंत 127.5 मिमीची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. यंदाच्या मोसमातील हा पहिला जाेरदार पाऊस होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.