आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बस - जीपचा भीषण अपघात:1 ठार, 30 प्रवासी जखमी, सिल्लोड कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्यानजीक घटना

सिल्लोड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटी बस - गॅस सिलेंडरने भरलेल्या वाहनाच्या धडकेत एक जण ठार तर 30 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सिल्लोड - कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याच्या पुढील वळणावर शुक्रवार रोजी सायंकाळी घडला.

​​​​​​​सिल्लोड होऊन पाचोरा मुक्कामी जाणारी सिल्लोड पाचोरा बस धानोरा फाट्यावर धानोरा फाट्यावरून पुढे निघाल्यावर वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या जीपची समोरासमोर धडक झाली.

जीप चालकाचा मृत्यू

अपघातात जीप चालक सुरेश सांडू गुंजाळ (वय 45, रा. पिंपळगाव पेठ तालुका, सिल्लोड) याचा जागीच मृत्यू झाला. एसटी बसमधील 30 प्रवासी जखमी झाले असून जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णवाहीकेद्वारे सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.

जखमींवर उपचार सुरू

या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गंभीर पाच जखमींना औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, बसचा समोरच्या भागाचे पुर्णतः नुकसान झाले तर जीपचाही चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिस पोहचले असून त्यांनी अपघाताचा पंचनामा सुरू केला. तसेच एकूण तीस प्रवासी जखमींवर उपचार सुरू आहेत. एसटी महामंडळानेही या अपघातानंतर माहीती घेत कार्यवाही सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...