आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना महामारी:गावागावांत क्वारंटाईन सेंटर सुरू करा; जि.प. सदस्यांना स्थायी समितीचे आदेश

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक गावांमध्ये दुकाने, टपऱ्या या बिनधास्तपणे सुरु राहतात.

औरंगाबाद जिल्हयातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या गटातील गावातील शाळा, मंगल कार्यालयांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करावे, असे आदेश जि.प. स्थायी समितीच्या सभेत देण्यात आले. ही सभा शुक्रवारी जि.प. अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. दरम्यान, यामध्ये ग्रामीण भागामधील कोरोनाबधितांची वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली. ऑनलाईन बैठकीत सहभागी झालेल्या सदस्यांनी आरोग्य सेवेबाबत सूचना केल्या.

जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या गटातील मोठ्या गावांमध्ये रुग्ण संख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायत व स्थानिकांना विश्वासात घेऊन शाळा, मंगल कार्यालये किंवा उपलब्ध असलेल्या जागेमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करावे, असे आवाहन शेळके, आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी यावेळी केले. सदस्यांनी गावा-गावांत जाऊन लसीकरण, उपचारासंदर्भात तसेच कोरोना चाचणीसंदर्भात जनजागृती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रेमडेसिवीर इंजेक्शन आता रुग्णालयातच मिळणार आहे, तशी मागणी रुग्णालयाला नोंदवावी लागणार असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.

तात्काळ गुन्हे दाखल करा

अनेक गावांमध्ये दुकाने, टपऱ्या या बिनधास्तपणे सुरु राहतात. आणि त्या ठिकाणी नागरिक गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. याकडे काही सदस्यांनी लक्ष वेधले असता सध्या कडक निर्बंध आहेत. त्यामुळे संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवकांकडे तक्रारी कराव्यात आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश जि. प.आरोग्य सभापती अविनाश गलांडे यावेळी बोलताना दिले. या बैठकीत केशवराव तायडे, रमेश पवार, शिवाजी पाथ्रीकर, मधुकर वालतुरे, रमेश गायकवाड, जितेंद्र जैस्वाल आदींनी ऑनलाईन सहभाग घेऊन सूचना केल्या.

हेल्पलाइन सुरु
दरम्यान वॉररुममध्ये हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. मात्र याची संपूर्ण माहिती जि. प. सदस्यांनाच नाही तर सामान्य लोकांना कशी होणार असा सवाल महिला व बालविकास सभापती अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...