आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूज:बनावट मेलद्वारे १८ लाखांचा गंडा; अमेरिकेतील भामट्याने वाळूजच्या उद्योजकाला फसवले

वाळूज21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘जी’ चे ‘क्यू’ करत २४,५६७.७२ डॉलर मागवले

वाळूज येथील मनू इलेक्ट्रिकलचे मालक विनायक देवळाणकर यांना अमेरिकेतील एका भामट्याने १८ लाखांचा गंडा घातला आहे. त्यांच्या कंपनीसाठी लागणारा कच्चा माल विदेशातून मागवतेवेळी समोरील कंपनीच्या ई-मेल आयडीशी मिळताजुळता मेल तयार करत या भामट्याने त्यांचे १८ लाख २८ हजार ३१७ रुपये लांबवले. देवळाणकर यांची एम-सेक्टरमध्ये इलेक्ट्रिकल उपकरणांची कंपनी आहे. त्यांना लागणारा कच्चा माल दक्षिण कोरियातील आयके टेक या कंपनीतून येतो. सप्टेंबर २०२० मध्ये कच्चा माल खरेदीसाठी त्यांनी याच कंपनीशी मेलद्वारे संपर्क साधला. त्यावर तुमचा माल तयार असून पैसे पाठवा, असा मेल आला. त्यांनी आलेल्या मेलवरील अकाउंटवर पैसे पाठवले.

मात्र, माल न मिळाल्याने त्यांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधला असता पैसे मिळालेच नसल्याचे कंपनीतून त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर देवळाणकर यांनी बजाजनगरातील मोरे चौकातील कोटक महिंद्रा बँकेत धाव घेत अधिक माहिती घेतली. तेव्हा बोगस मेल आयडीवरून आलेल्या मेलवरील अकाउंटवर पैसे पाठवल्याचे त्यांच्या लक्षात आले.संबंधित भामट्याने अमेरिकेतील अकाउंटवर रक्कम वळती केल्याचे बँकेच्या लक्षात आले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

‘जी’ चे ‘क्यू’ करत २४,५६७.७२ डॉलर मागवले
देवळाणकर यांनी kljung0830@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधून सव्वाअठरा लाखांचे मटेरियल खरेदीची ऑर्डर दिली. त्यांना kljunq0830@gmail.com या बनावट मेल आयडीवरून मेल आला. भामट्याने तुमचा माल तयार असून मेलमध्ये दिलेल्या अकाउंट क्रमांकावर २४ हजार ५६७.७२ डॉलर पाठवण्यास सांगितले. मेलमधील ‘जी’ ऐवजी ‘क्यू’चा बदल देवळाणकर यांच्या लक्षात न आल्याने ते फसले.

बातम्या आणखी आहेत...