आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:औरंगाबादच्या कन्नडमध्ये भीषण अपघात, कार आणि दुचाकीच्या धडकेत दोन तरुण चिरडले​​​​​​​

औराळा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळू कांबळे, तात्यासाहेब जाधव - Divya Marathi
बाळू कांबळे, तात्यासाहेब जाधव

कन्नडमध्ये कारच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कन्नड-वैजापूर रोडवर गव्हाली फाट्याजवळ कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात बिबखेडा येथील बाळू लक्ष्मण कांबळे (३८) तात्यासाहेब गवजी जाधव (३५) या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम.एच.१९ सी.एफ. ००७० स्विफ्ट कार चालक रोडची परिस्थितीती लक्षात न घेता तो भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवत कन्नड कडे जात असताना गव्हाली फाटा येथे कन्नडवरून एम.एच.२० ए. एफ.बी २१८५ या दुचाकीवरून बाळू कांबळे, व तात्यासाहेब जाधव त्यांच्या बाजुने औराळ्याकडे येत असताना भरधाव वेगाने येत असलेल्या सिप्टकारने या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बाळु कांबळे, तात्यासाहेब जाधव हे गंभीर जखमी झाले.

उपचारासाठी औरंगाबाद येथे घेऊन जात असताना वाटेतच या दोघांची जीवनज्योत मावळली. बीट जमादार शिवनाथ आव्हाळे, विजय धुमाळ यांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा केल्यानंतर ज्ञानेश्वर गवजी जाधव यांनी दिलेली फिर्यादी वरुन चालकाविरोधात देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास खाडखुळे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...