आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शासकीय कोट्यातील डीएलएडच्या रिक्त जागा विशेष फेरीतून भरण्याच्या सूचना, अशी आहे प्रक्रिया

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डी.एल.एड. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ मधील शासकीय कोट्यातील रिक्त जागा विशेष फेरीद्वारे भरण्याच्या सूचना सर्व शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचाऱ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेचे संचालक एम. डी. सिंह यांनी दिल्या आहेत.

राज्यस्तरीय समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील अध्यापक विद्यालयातील शासकीय कोट्यातील डीएलएड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशाच्या तीन फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत. परंतू, अजूनही शासकीय कोट्यातील जागा रिक्त आहेत. या जागा विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्याची परवानगी शिक्षण आयुक्तांनी दिली आहे. याबाबत संबंधित जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशील परीषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने ऑनलाईन प्रवेश होणार असून विद्यार्थ्यांनी २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान www.maa.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज करावेत. पडताळणी अधिकाऱ्यांनी २४ ते ३० सप्टेंबर या दरम्यान प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करावी. या विशेष फेरीतून बारावी उत्तीर्ण असलेले, नव्याने आलेले अर्ज, नियमित प्रवेश प्रक्रियेत अपुर्ण अर्ज केलेले, सबमिट किंवा ॲप्रू न झालेले, आणि ऑनलाईन प्रवेश फेरीत प्रवेश न घतलेले विद्यार्थी भाग घेवू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यालय मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे प्राधान्यक्रम बदलून रिक्त जागा असलेल्या विद्यालयाचा पसंतीक्रम द्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी डीएलएड ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी ऑनलाईन शुल्क भरले आहे. त्यांनी नव्याने शुल्क भरण्याची गरज नाही. पंरतू, त्यांनी ईमेल, मोबाईल नंबर तोच वापरणे गरजेचे आहे. अर्ज पडताळणीनंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित होतील.

बातम्या आणखी आहेत...